UPSC Final Result 2020: यूपीएससीने नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. शुभम कुमार या परीक्षेत अव्वल आला आहे. यूपीएससीच्या निकालानुसार, नागरी सेवा परीक्षेत जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे. यात ट्रक दे इंडिया या बेस्टसेलर पुस्तकाचा लेखक आणि पत्रकार रजत उभायकर यानेही घवघवीत यश मिळवलं आहे. 


रजत यूपीएससी परीक्षेत 49 व्या रँकने उत्तीर्ण झालाय. गेल्या वर्षी त्याची 348 वी रँक होती. सातारा सैनिक स्कूलचा विद्यार्थी आहे. रजत उभायकर ट्रक दे इंडिया या बेस्टसेलर पुस्तकाचा लेखक आणि आऊटलूक इंडियाचा वरीष्ठ प्रतिनिधीही आहे. 


नागरी सेवा परीक्षा 2020 मध्ये 761 उमेदवार उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 545 पुरुष आणि 216 महिला आहेत. आयएएस अधिकारी आणि 2015 बॅचची टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया डाबी यांनीही यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. रिया डाबीने 15 वी रँक मिळवली आहे.


टॉपर शुभम कुमारने आयआयटी बॉम्बे मधून बी टेक (सिव्हिल इंजिनिअरिंग) केले आहे आणि तो बिहारच्या कटिहारचे आहेत. जागृती अवस्थीने MANIT भोपाळमधून B Tech (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) केले आहे.


यूपीएससी दरवर्षी नागरी सेवा परीक्षा तीन टप्प्यात घेते ज्यात प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असतो. या परीक्षांच्या माध्यमातून, उमेदवारांची भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवा (IPS) यासह इतर विविध सेवांसाठी निवड केली जाते.


मागील वर्षी 4 ऑक्टोबर रोजी प्राथमिक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 10 लाख 40 हजार 60 उमेदवारांनी अर्ज केले होते आणि 4,82,770 लोक परीक्षेत बसले होते. यापैकी 10 हजार 564 उमेदवार मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुख्य परीक्षा या वर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आली. यापैकी 2,053 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI