एक्स्प्लोर

यूपीएससीचे यशवंत : वडिलांच्या निधनानंतर मित्रांच्या मदतीने स्पर्धा काबीज

वसई विरार येथील महापालिकेच्या वाचनालयात जाऊन तेथील पुस्तकांच्या जोरावर पुन्हा त्याने जोरदार तयारी सुरु केली. मात्र प्रत्येक वेळेला आर्थिक अडचणी सातत्याने त्याच्यासमोर उभ्या राहू लागल्या.

पंढरपूर : जिद्द आणि चिकाटी असेल, तर मार्ग नक्कीच मिळतो, हे पंढरपूरच्या संतोष माळीने दाखवून दिलं. वडिलांच्या निधनानंतर नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेसाठी धडपडत असलेल्या संतोषच्या मदतीला त्याचे मित्र धावून आले आणि त्यांच्याच मदतीमुळे संतोषने यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलं. संतोष सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. प्राथमिक शाळेपासून इंजिनिअरिंगच्या पदवीपर्यंत त्याचं सर्व शिक्षण पंढरपूरमध्येच झालं. स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यावर कॅम्पसमधून बंगळुरुतील मोठ्या कंपनीत त्याची निवड झाली. संतोषचे वडील पाटबंधारे विभागात नोकरीला होते. या काळातच संतोषने नोकरी सोडून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्ष तो अभ्यासासाठी जाऊन राहिला. पण दैवाच्या मनात काही औरच असतं, असं म्हणतात. अचानक संतोषला वडिलांच्या निधनाची बातमी आली आणि तो दिल्ली सोडून पुन्हा पंढरपूरमध्ये आला. यानंतर मात्र त्याने पुन्हा एकदा गांभीर्याने अभ्यास सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी आर्थिक अडचणी सुरु झाल्याने त्याने मुंबईतील मामाकडे जाऊन राहणं पसंत केलं. वसई विरार येथील महापालिकेच्या वाचनालयात जाऊन तेथील पुस्तकांच्या जोरावर पुन्हा त्याने जोरदार तयारी सुरु केली. मात्र प्रत्येक वेळेला आर्थिक अडचणी सातत्याने त्याच्यासमोर उभ्या राहू लागल्या. घरच्या परिस्थितीमुळे कुटुंबाकडून मिळणारी आर्थिक मदत पुस्तकं खरेदी आणि तयारीसाठी कमी पडत होती, तरीही संतोषने जिद्द सोडली नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातील मित्रांकडून आर्थिक मदत घेत त्याने आपली तयारी सुरुच ठेवली. अखेर UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि संतोष देशात 612 वा रँक मिळवून यशस्वी झाला. संतोषच्या यशामुळे त्याच्या आईला अश्रू अनावर झाले आहेत. संतोषच्या निकालाचा आनंद त्याच्याइतकाच त्याला मदत करणाऱ्या मित्रांनाही झाला आहे. स्पर्धा परीक्षेत जिद्द, प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नात सातत्य असेल तर कोणतीच अडचण तुम्हाला यशापासून दूर ठेवू शकत नसल्याचं संतोष सांगतो. यावेळी आयएएस निवडता येणार नसल्याने पुन्हा आपले प्रयत्न सुरु ठेवणार असल्याची जिद्द देखील त्याने आजही ठेवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget