एक्स्प्लोर

अपक्ष आमदार बच्चू कडू यांना अटक आणि सुटका, 2018 मध्ये मंत्रालयात घातलेल्या राड्याचं प्रकरण

Mla Bacchu Kadu : वारंवार समन्स बजावूनही हजर न झाल्यानं गिरगाव दंडाधिकारी कोर्टाची कारवाई मात्र मुंबई सत्र न्यायालयानं तात्पुरता जामीन मंजूर केल्यानं बच्चू कडूंना दिलासा

Mla Bacchu Kadu :  अपक्ष आमदार बच्चू कडू यांना मुंबईतील गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं साल 2018 रोजी केलेल्या एका राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर तातडीनं मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत बच्चू कडू यांनी ताप्तुरता जामीन मंजूर मिळवला आहे.  आमदार बच्चू कडू हे एम.पी.एस.सी , परीक्षा घेण्यात येणाऱ्या महापोर्टल  बंद करण्यासाठी तत्कालीन , पी, प्रदीप .महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक यांची 26 सप्टेंबर 2018 रोजी मंत्रालय येथे भेट घेतली होती. यावेळी पी प्रदीप आणि आमदार बच्चू कडू यांच्यत वाद झाला होता. तेव्हा , बच्चू कडू यांनी टेबलावरील  लॅपटॉप पी प्रदीप यांच्यावर उगारला होता , त्यामुळे मंत्रालय कर्मचारी यांनी उग्र आंदोलन केले होते. तर याप्रकरणी प्रदीप यांनी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. 

काय आहे प्रकरण -

26 सप्टेंबर 2018 रोजी पोर्टलसंबधित प्रकरणाबाबत मंत्रालयमध्ये काम करणाऱ्या तत्कालीन माहिती तंत्रज्ञान संचालक पी. प्रदीप यांना भेटण्यासाठी बच्चू कडू गेले होते. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये बच्चू कडू यांनी टेबलवर असलेला लॅपटॉप उचलून प्रदीप यांच्यावर उगारल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद कर्मचारी संघटनेत उमटले होते आणि  मंत्रालय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही केलं होतं. त्यानंतर बच्चू कडू यांच्यावर आंदोलन करताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल आयपीसी कलम 353, 504 आणि 506 अंतर्गत फौजदारी तक्रार मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

कोर्टात नेमकं काय झालं -

यासंबंधी गिरगाव न्यायालयात रितसर खटला सुरू आहे. या खटल्याचं वारंवार समन्स बजावूनही बच्चू कडू कधीही सुनावणीला हजर रहीले नाहीत. त्यामुळे न्यायालयानं अखेर या प्रकरणात त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यावर बुधवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान बच्चू कडू स्वतः अखेर कोर्टापुढे हजर झाले, आणि त्यांच्याकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र, न्यायालयानं हा अर्ज स्वीकारण्यास नकार देत त्यांना थेट चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गिरगाव दंडाधिकारी न्यायालयानं ही कोठडी सुनावल्यानंतर बच्चू कडू यांच्यावतीनं तातडीनं मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर संध्याकाळी उशिरा तातडीची सुनावणी पार पडली तेव्हा, न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बच्चू कडू यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर ताप्तुरता जामीन मंजूर केला.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Chavan Death Case Beed Crime News: बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणार्‍या वैभव चव्हाणचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अंगावर मारहाणीच्या जखमा, बीडमधील घटना
बोगस खेळाडूंचे रॅकेट उघडकीस आणणार्‍या वैभव चव्हाणचा मृतदेह आढळल्याने खळबळ; अंगावर मारहाणीच्या जखमा, बीडमधील घटना
Gokul President Election 2026: गोकुळवर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती योग्य की अयोग्य?; अँड. श्रीकृष्ण गणबावले यांची चक्रावणारी माहिती
गोकुळवर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती योग्य की अयोग्य?; अँड. श्रीकृष्ण गणबावले यांची चक्रावणारी माहिती
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Maharashtra Live News Updates: 'गोकुळ'मध्ये स्वीकृत संचालकांवरून वादंग सुरूच
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
63 तासांनंतर स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन मागं; पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी फुटली, वाहतूक पूर्वपदावर
Praful Patel Meet Sharad Pawar: 10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
10 तारखेनंतर आपण एकत्र बसू....; शरद पवारांच्या प्रफुल पटेलांना सूचना,मोदींच्या विधानाचीही चर्चा
Sunetra Pawar: पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
पायल झांबरेच्या आईशी फोनवरून सुनेत्रा पवारांनी केली चर्चा; तपास फास्टट्रॅकवर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणाल्या, 'तुमच्या भावना मला समजू शकतात, मीसुद्धा एक आई...'
Raju Shetti Protest Sugarcane Farmers: 61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
61 तासांनी राजू शेट्टींचं चक्काजाम आंदोलन स्थगित; 3900+100+200 रुपयांचा ठरला फॉर्म्युला, किणी टोलनाक्यावर घोषणा
Chandrapur News: प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
प्रतिभा धानोरकर अन् विजय वडेट्टीवारांच्या ऐक्याला दिवाळीपूर्वीच फटाके! चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी पुन्हा राजेश अडूर यांची वर्णी
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Embed widget