एक्स्प्लोर

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा प्रदीर्घ काळापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता

मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद आणि नागपूरप्रमाणे कोल्हापूर खंडपीठही व्हावे या मागणीसाठी मागील 35 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यांचा संघर्ष सुरू आहे.

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबादप्रमाणे कोल्हापुरातही हायकोर्टाचं सर्किट बेंच असावं या मागणीसह कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग यांची भेट घेतली. तेव्हा, यावर त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन कृती समितीला दिले आहे. लवकरच अन्य न्यायमूर्तीशी याविषयी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी शिष्टमंडळाला दिले. याप्रक्रियेत काही अडचणी, समस्या असल्या तरी पक्षकारांची सोय आणि खटले लवकरात लवकर निकाली लागणं हाही मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करता या खंडपीठाबाबत गांर्भियाने विचार करण्यात येईल, अशी भावना व्यक्त करत मुख्य न्यायामूर्तींनी व्यक्त केली. त्यांच्या या सकारत्मक भूमिकेमुळे आता कोल्हापूर खंडपीठाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद आणि नागपूरप्रमाणे कोल्हापूर खंडपीठही व्हावे या मागणीसाठी मागील 35 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यांचा संघर्ष सुरू आहे. त्या अनुषंगाने शनिवारी कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदरजोग यांच्यात जवळपास  बैठक पार पडली. काय आहे प्रकरण? भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर हे राज्यातील मध्यवर्ती शहर आहे. जागेची उपलब्धता, मुख्यमंत्र्यांनी निधीसाठी दिलेलं आश्वासन आणि सहा जिल्ह्यांचा संघर्ष, हे सर्व पाहता, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, अशी मागणी खंडपीठ कृती समितीद्वारे करण्यात येत आहे. खंडपीठ निर्मितीचे सर्वच निकष कोल्हापूरने पूर्ण केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयापासून सुमारे साडेपाचशे किलोमीटर अंतर आणि 60 हजार प्रलंबित खटल्यांची संख्या याचा विचार करूनच कोल्हापूरसाठी खंडपीठाची मागणी सुरू झाली. भौगोलिकदृष्ट्या कोल्हापूर हे सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सोयीचे आहे. त्यामुळे आसपासच्या सर्वच जिल्ह्यांनी सातत्याने कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला सक्रीय पाठिंबा दर्शवला आहे. कोल्हापूर खंडपीठासाठी रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर व इतर बार असोसिएशननं याआधी माजी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. निवृत्तीआधी शहा यांनी या प्रस्तावावर निर्णय घेणे अपेक्षित होते. निर्णय न घेताच शहा हे निवृत्त झाले. याने संतप्त झालेल्या असोसिएशनने साल 2016 मध्ये मोहित शहा यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत कामबंद आंदोलन पुकारलं होते. याप्रकरणी न्यायालयाने स्वत:हून असोसिएशनविरोधात सुओमोटो न्यायालयाचा अवमान याचिका दाखल करून घेत न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं या संघटनांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. या सुनावणीत न्यायालयाने असोसिएशनला कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये, अशी नोटीस जारी केली होती. त्यानंतर असोसिएशननं माफी मागत भविष्यात अश्याप्रकारचं काम बंद न करण्याची हमी न्यायालयात दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Heavy Rain: खडकवासला धरण तुडुंब भरलं, मध्यरात्रीच्या अंधारात दरवाजे उघडले, पुण्यात हायअलर्ट
खडकवासला धरण तुडुंब भरलं, मध्यरात्रीच्या अंधारात दरवाजे उघडले, पुण्यात हायअलर्ट
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
Embed widget