एक्स्प्लोर

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, इंदापूर तर कोल्हापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात हिंगोली, लातूरमध्ये तर विदर्भात वाशिममध्ये तर उत्तर महाराष्ट्र नाशिक, मनमाडमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, इंदापूर तर कोल्हापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात हिंगोली, लातूरमध्ये तर विदर्भात वाशिममध्ये तर उत्तर महाराष्ट्र नाशिक, मनमाडमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. तिकडे कोकणातही पाऊस धो-धो बरसला आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.

कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये आज पावसाच्या सरी बरसल्या. दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरही आज तुफान पाऊस झाला. सलग 2 तास मुसळधार पाऊस पडल्यानं गडावरुन पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता.

सांगली जिल्ह्यालाही आज मुसळधार पावसानं झोडपलं. सांगली शहरासह इस्लामपूर, कडेगाव, पलूस, तासगाव, मिरज तालुक्यात दमदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे कराड तालुक्यातील साळशीरंबे येथील ओढा दुथडी भरुन वाहत असल्याचं पाहायला मिळालं.

हिंगोलीत आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह हवेत गारवा निर्माण झाला होता. तर काही ठिकाणी अर्धा तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कनेरगाव नाका परिसरात मात्र जोरदार पाऊस झाला.

वाशिममध्येही आज सकाळी 6 वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

कोकणातही पावसाची दमदार हजेरी

तळकोकणात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी अशा सर्वच भागात आज दमदार पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. विजांचा कडकडाट व ढगांच्या जोरदार गडगडाटासह, जोरदार पाऊस झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजूच्या मोहोरावर रोगाचा पादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच फळांना काळे डाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातही काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्याच्या महाड, पोलादपूर परिसरात परिसरात आज पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचं नुकसान झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस, ताशी 70 ते 90 किमी वेगानं वारेही वाहणार, गडकिल्ल्यांसह, धबधबे, धरणांवर जाण्यास बंदी, महत्वाचे आदेश जारी
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget