(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनलॉक केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली : आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाचा संसर्ग हा संपर्काने वाढत आहे. त्यामुळे जोपर्यंत लस येणार नाही तोपर्यंत काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे
मुंबई : दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनलॉक केल्यामुळे रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्हाबंदी उठवली, हॉटेल सुरू केले आहे. तसेच कार्यालयात उपस्थिती वाढवली याचा हा परिणाम आहे. कोरोनाचा संसर्ग हा संपर्काने वाढत आहे. त्यामुळे जोपर्यंत लस येणार नाही तोपर्यंत काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मास्क वापरले नाही तर 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तरीदेखील बाहेर फिरताना मास्क वापरत नाही. कोरोनाची भीती बाळगू नये परंतु जागरुक राहणे आवश्यक आहे, असे देखील ते म्हणाले.
पुण्यात कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळत नाही. यावर टोपे म्हणाले, जशी रुग्णसंख्या वाढते तसा व्यवस्थेवर ताण पडतो. लक्षण नसलेल्या रुग्णांनी घरातचं क्वारंन्टाईन केले पाहिजे. महाराष्ट्राचा रीकव्हरी चांगला आहे. पुण्यात ऑक्सीजन बेड सुविधा वाढवल्या आहेत.
पुण्यातील जम्बो रुग्णालयातील 120 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याबद्दल बोलताना टोपे म्हणाले, जम्बो फॅसिलिटी बाबत आउटसोर्स केलं जातं. ज्यांना हे काम दिलं ही त्याबच्या जबाबदारी आहे. टेंडरच्या माध्यमातून काम करणं बंधनकारक आहे. त्यांना जमत नसेल तर बदलून टाका, नवीन घ्या. जम्बो रुग्णालयाचे उद्घाटन करण्यामागे रुग्णालय लवकर कार्यान्वित करावे हा हेतू होता. उद्घाटन करणे गैर नाही,पण ज्या उद्देशाने केले त्यांना सेवा मिळाली पाहिजे. तसेच जम्बो रुग्णालयाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
टोपे म्हणाले, यंत्रणेला थोडी मरगळ आली आहे. पण आपण मिशन मोडवर आहोत त्यामुळे असं होऊ नये. जोपर्यंत आपण सर्व गोष्टीवर नियंत्रण मिळवत नाही तोपर्यंत मरगळ येता कामा नये. नियम पळून अधिवेशन होणार आहे. प्रत्येक सदस्य,त्यांचे पीए पीएस टेस्ट करून आत सोडणार आहे. 450 VIP टेस्ट झाल्या कोणी पॉझिटिव्ह नाही. 11 कर्मचारी पॉझिटिव्ह आले त्यांना वगळण्यात येईल. कालच्या एक दिवसात 1770 टेस्ट झाल्या 1500 रिपोर्ट आले. त्यात 11 कर्मचारी पॉझिटिव्ह आले.