एक्स्प्लोर

अक्कलकोटमधील शाळेची भन्नाट कल्पना, मंदिराच्या भोंग्यावरुन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं. यावर अक्कलकोटमधील बादोले गावातील शाळेने एक भन्नाट आयडिया शोधली आहे.

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनची स्थिती आहे. सर्व व्यवसाय, उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. मात्र शाळा अद्याप सुरु झालेल्या नाहीत. अशा स्थितीवर मात करत काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. मात्र ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं. यावर अक्कलकोटमधील बादोले गावातील शाळेने एक भन्नाट आयडिया शोधली आहे. अक्कलकोटमधील बादोले गाव. गावात जवळपास पाच हजार लोक राहतात. गावात अनेक कष्टकरी आणि गरीब कुटुंबिय राहतात. गावात विद्यार्थ्यांसाठी दोन प्राथमिक आणि केवळ एक हायस्कूल आहे. त्यामुळे पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातील विद्यार्थ्यांना याच शाळेत घ्यावं लागतं. कोरोनामुळे अनेक गोष्टी बंद पडल्या तसं शाळांना देखील कुलूप लागले. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये यासाठी शाळेतील शिक्षकाने एक भन्नाट कल्पना राबविली. शाळा बंद असल्याने राज्यातील अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केलं. मात्र शाळेतील शिक्षकांनी गावचा सर्व्हे केला. तेव्हा गावातील केवळ तीस टक्के लोकांकडेच स्मार्ट फोन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. त्यातूनच शाळेत कला शिक्षक असलेल्या मयूर दंतकाळे या शिक्षकाच्या डोक्यातून वेगळी कल्पना समोर आली. गावातील मंदिर, समाज मंदिर, भजनी मंडळांशी त्यांनी संपर्क केला. अन् थेट मंदिरांच्या ध्वनिक्षेपकांवरुनच शाळेचे पाठ शिकवायला सुरुवात केली. ग्रामस्थ आणि मंदिर समितीतील लोकांनी देखील मोठ्या आनंदात या उपक्रमाचे स्वागत केले. के. पी. गायकवाड शाळेतील शिक्षकांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या कविता, पाढे इतर शैक्षणिक अभ्यासक्रम ऑडियो फॉरमॅटमध्ये संकलित केलं आणि "शाळा बंद, शिक्षण चालू" या उपक्रमाला सुरुवात झाली. शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी मंदिरात जातात आणि गावातील विद्यार्थी सकाळी 7 ते 9 या वेळेत भोंग्यावरून सुरू झालेल्या कविता आणि धडे ऐकून ते गिरवू लागले. शिक्षकांच्या या प्रयत्नांचे गावातील विद्यार्थी आणि पालक देखील मोठ्या उत्साहात स्वागत करत आहेत. शाळा बंद, शिक्षण चालू या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुख्याध्यापक सुनील गुमास्ते, अध्यक्ष मल्लिनाथ बगले, सचिव माधव बगले, महादेव सोनकर, कैलास गायकवाड, नागनाथ धर्मसाले यांच्या सहकार्यामुळे हे उपक्रम सुरु होऊ शकले. विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच खंड पडू नये, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण गावात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांचे सहकार्य असल्याने हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया शिक्षक मयुर दंतकाळे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. कोरोनाच्या महामारीने अख्या देशाची परिस्थिती बदलली. सारं काही बंद आहे. त्यात देवाची दारं देखील अपवाद नाहीयेत. मात्र मयूर दंतकाळे सारखे शिक्षक असतील तर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखाना आणखी बळ मिळेल यात शंका नाही.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget