Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगर महापालिका मुख्यालयातच महापालिका कर्मचाऱ्याला ठेकेदाराने मारहाण केलीय. रस्त्याच्या कामाच्या फाईल संबंधी ठेकेदाराने या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठेकेदाराने पालिका कर्मचाऱ्यांवर 10 टक्के लाच मागत असल्याचा आरोप केलाय.


मारहाणीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, या सीसीटीव्हीत महापालिका कर्मचारीच आधी ठेकेदारावर हात उचलत असल्याचे दिसत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारवाई नक्की कोणावर करावी यावरून पोलीस गोंधळात पडले आहेत. 


उल्हासनगर महापालिका लेखा विभागात संदीप बीडलान हे बील तपासण्याचे काम करतात. जय भारत कन्स्ट्रक्शनचे रस्त्याच्या कामाचे बील संदीप बिडलान यांच्याकडे आले होते. या वेळी संदीप हे फाईलचे काम पूर्ण करत नसल्याच्या रागातून ठेकेदार अजय आणि संजय नावाच्या दोन व्यक्तींनी संदीप यांना शिवीगाळ करत मारहाण केली, अशी तक्रार बिडलान यांनी केली आहे. बिडलान यांच्या तक्रारीवरून ठेकेदाराविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


दरम्यान, या प्रकरणी ठेकेदार अमित चांदनांनी यांनी  पालिका कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. पालिकेच्या कुठल्याही कामाचे बाल काढायचे असेल तर या अधिकाऱ्यांना 10 टक्के लाच द्यावी लागते, नाही तर बील निघत नाही. असा आरोप चांदनांनी यांनी केलाय. शिवाय या प्रकरणी आधीच पालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून त्या संबंधी अजून काही कारवाई झाली नाही. आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आमच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्यावं आणि आमचे अडकलेले बील लवकर द्यावं अशी मागणी या दांदनांनी केली आहे.


महत्वाच्या बातम्या


OBC Reservation: आमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सगळ्या ओबीसींचे आरक्षण गेले; भुजबळांची भाजपवर घणाघाती टीका


Fire At Mumbai : शाहरुख खानचा बंगला 'मन्नत' च्या बाजूच्या इमारतीत आग; आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू