Fire At Mumbai : वांद्र्यातल्या जीवेश इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर काल आग लागल्याची घटना घडली. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या जवळील जीवेश इमारतीला ही आग लागली. दरम्यान आग लागल्याच्या एका तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आग विझवण्याच्या प्रयत्नात 31 वर्षीय अग्निशमन कर्मचाऱ्याचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
जीवेश इमारतीत संध्याकाळी 7.30 च्या सुमारास आग लागली, असे अधिकाऱ्याने सांगितले. आगीची सद्यस्थिती विचारली असता आग विझवण्यासाठी काल रात्री 10.25 पर्यंत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान कौशल खजानसिंग राजपूत यांचा गुदमरून मृत्यू झाला.
अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, जीवेश टॉवर मध्ये काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोठी आग लागली, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल एका तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवले आहे. ही आग या इमारतीच्या 14 मजल्यावर लागली होती. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाचा1 कर्मचारी आग विझवताना जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे,
आग कशामुळे लागली याची चौकशी सुरू
जखमी अग्निशमन दलाच्या जवानाला जवळच भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे, सध्या फायर कूलिंगचे काम सुरू आहे, मात्र ही आग कशामुळे लागली याची चौकशी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या