एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'दारु कंपन्यांचं पाणी बंद करा, माझाच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंची साथ'
औरंगाबाद: बीअर कंपन्यांविरोधात 'एबीपी माझा'ने हाती घेतलेल्या मोहीमेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. मराठवाड्यात दारु कंपन्यांना दिलं जाणारं पाणी तात्काळ बंद करा, दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
औरंगाबादमध्ये शिवसेनेनं आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात उद्धव बोलतं होते. राज्यात आयपीएलनंतर बीअर कंपन्यांचं पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी होत आहे. मद्यप्रेमींना पिण्यासाठी पाणी आहे. पण तहानलेल्यांना पिण्यासाठी पाणी नाही. हीच शोकांतिका माझानं मांडल्यानंतर, आता मराठवाड्यातल्या दारु कंपन्यांविरोधात लोकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
आता सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेनंही हीच मागणी केल्यानं सरकार यावर काय उत्तर देतं. याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement