एक्स्प्लोर

श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..

काळे झेंडे आंदोलनानंतर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांची माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली

नांदेड : राज्यातील खासदार फुटीनंतर (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी (Shivsena) सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त केल्याचं दिसून आलं. ठाकरेंच्या सहा खासदारांनी अचानक उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवधनुष्य हाती घेतलं. त्यानंतर, या सहाही खासदारांच्या मतदारसंघात त्यांना सर्वसामान्य जनतेच्या टीकेचा सामना करावा लागला. तर, उद्धव ठाकरेंनी देखील त्यांच्या मतदारसंघात जाऊन जोरदार हल्लाबोल केला. दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) या सहा खासदारांना बळ देत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज नांदेड दौऱ्यात श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर, संबंधित शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी फोन करुन शाबासकी दिली. 

नांदेड जिल्ह्यात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदेंनी हजेरी लावली. त्यावेळी, यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. काळे झेंडे आंदोलनानंतर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या शिवसैनिकांची माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून विचारपूस केली. येथील ग्रामीण जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्याशी संवाद साधत त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि, "तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कुठलाही धोका नाही, काही अडचण असल्यास मला सांगा," असा विश्वास दिला. 

उद्धव ठाकरेंच्या फोनमुळे उत्साह

उद्धव ठाकरेंचा फोन आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला, यावेळी कार्यकर्त्यांनीही आजीवन आपल्यासोबत राहण्याची ग्वाही दिली. तसेच, पुढील टप्प्यात किनवट दौऱ्यावर येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी मोबाईल कॉलद्वारे कार्यकर्त्यांना सांगितले. सध्या जिल्ह्यात आजच्या काळे झेंडे आंदोलनाची आणि उद्धव ठाकरेंच्या फोनची जोरदार चर्चा सुरू आहे. 

आत्मपरिक्षण करा, लोक तुम्हाला सोडत आहेत

एकनाथ शिंदे साहेबांशी जो जोडला तो मोठा झालाय, 40 चे 60 आमदार झाले, 6 चे 13 खासदार झाले. नागेश पाटील आष्टीकर तिकडे होते तेव्हा सभेला जागा पुरत नव्हती, आता आष्टीकर आमच्याकडे आले की छोट्या हॉलमध्ये रडारड केली, असे म्हणत श्रीकांत शिंदेंनी नांदेडमधून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. श्रीकांत शिंदेंनी नांदेड दौऱ्यात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिंदे साहेबांनी शेतकरी, लाडक्या बहिणींचा विचार केला, तुम्ही अडीच वर्षे घरात बसून राहिलात, कोणाला काहीच दिलं नाही. म्हणून लोक तुम्हाला सोडत आहेत, तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा, तो गेला तर मला काही फरक पडत नाही म्हणत म्हणत त्यांचं दुकान रिकामं झालं, आम्ही घरात बसुन फुशारक्या मारत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली. 

हेही वाचा

खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Analogue paneer: महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Embed widget