एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही; अध्यक्षांना पत्र देताच उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं

Maharashtra Budget Session : लोकशाही मूल्यांचे पालन करून विधानसभा अध्यक्ष हे विरोधी पक्षनेतेपदावर निर्णय घेतील अशी आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. 

मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आलं. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला शरद पवारांच्या पक्षाने ठेवल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आता स्वतः उद्धव ठाकरेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच संतोष देशमुख प्रकरणात एवढे फोटो, व्हिडीओ समोर आल्यानतंरही धनंजय मुंडे जर आजारामुळे राजीनामा देत आहे असं म्हणत असतील तर त्यांचा देशमुख प्रकरणात राजीनामा का घेतला गेला नाही असा प्रश्नही त्यांनी विचारला. 

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा जवळपास सुटल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने या पदावर दावा केला आहे. ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असून तशा आशयाचं पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेते पदासाठी भास्करराव जाधव यांच्या नावाची मागणी केलेली आहे. आम्हाला खात्री आहे ही लोकशाही मूल्यांचा पालन करून लवकरात लवकर यावर निर्णय होईल. बजेटपूर्वी विरोधी पक्ष नेतेपद दिले जाईल."

मुख्यमंत्र्यांचे हात कोणी बांधले आहेत? 

उद्धव ठाकरे म्हणाले की, "धनंजय मुंडे यांच्यावर जे काय बोलायचं होतं ते सगळ्या माझ्या आमदारांनी बोललं आहे. आता हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडीओ किंवा फोटो आले आहेत ते आधी सरकारकडे आले होते की नव्हते? आता फक्त धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला आहे. अजून पुढे अनेक गोष्टी येतील.  मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असेल तर त्यांचे स्वागत आहे. पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधत आहेत का?"

मुंडेंचा राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावर की आजारीपणामुळे? 

धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यावर की आजारापणामुळे घेण्यात आला असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. ते म्हणाले की, "धनंजय मुंडे यांनी तब्येतीचं कारण देत राजीनामा दिला आहे. तर अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा दिला. नैतिकतेचा मुद्दा असेल तर एवढे दिवस त्यांचा राजीनामा का घेतला नाही? मुंडेंनी तब्येतीचं कारण सांगितलं असेल आणि आता जर एवढे व्हिडीओ आणि फोटो समोर आले असतील तरीही त्या गोष्टीवरून त्यांचा राजीनामा का घेतला नाही हे स्पष्ट करावं."

महाराष्ट्र बदनाम होतंय

उद्धव ठाकरे म्हणाले की, "आधी फक्त यूपी आणि बिहारचे नाव बदनाम होतं. आता त्या दोन राज्यांसह महाराष्ट्रातही भाजपचं राज्य आहे. त्या दोन राज्यात काय सुरू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. महाराष्ट्रात तर त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आहे. या सगळ्याचा नागरिकांना आता कंटाळा आला आहे. यांच्यामुळे हे सरकार नव्हे तर महाराष्ट्र बदनाम होत आहे."

 

ही बातमी वाचा: 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला; उद्याचा मोर्चा काढणार का? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले....
Sharad Pawar on Dharmendra Pradhan Resignation: 'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
'माझी मोदींशी जी चर्चा झाली त्याचा परिणाम आज दिसला'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांनी मोदींसोबतच्या 'त्या' भेटीची इनसाईड स्टोरी सांगितली
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या
हीच भारताची ताकद, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आमदार आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकारकडे केल्या प्रमुख तीन मागण्या
Abhijeet Dipkes Parents Reaction: 'आता डोळ्यात आनंदाश्रू....', धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंच्या आई- वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले घरात असताना धाकधूक
'आता डोळ्यात आनंदाश्रू....', धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपकेंच्या आई- वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले घरात असताना धाकधूक

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget