एक्स्प्लोर
सत्तेसाठी ब्लॅकमेलिंग नाही, शिवसेनेचा वाघ 24 तासात मवाळ
![सत्तेसाठी ब्लॅकमेलिंग नाही, शिवसेनेचा वाघ 24 तासात मवाळ Uddhav Thackeray On Backfoot Over Cabinet Ministry To Shivsena सत्तेसाठी ब्लॅकमेलिंग नाही, शिवसेनेचा वाघ 24 तासात मवाळ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/09183252/Kolhapur-Uddhav-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही, आम्ही आमच्या हक्काची जागा मागून घेऊ असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची भाषा 24 तासात बदललीय. सत्तेसाठी आम्ही कुणाला ब्लॅकमेल करणार नाही, तसंच मंत्रिपद मागायला दिल्लीला जाणार नाही, असं म्हणून उद्धव ठाकरेंनी थोडी सावध भूमिका घेतलीय.
बहिष्कार बारगळला, शिवसेनेची शपथविधीला हजेरी !
'शिवसेनेला मंत्रिपदासाठी किंवा इतर गोष्टींसाठी ओढाताण करायची नाहीए. पण दुसरीकडे लाचार होण्याचीही आमची तयारी नाही,' असं उद्धव यांनी म्हटलंय. तसंच दोन्ही पक्षांनी समन्वय आणि सामंजस्याची भूमिका घेण्याचं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलंय.केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही : उद्धव
लाचार न होण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे 24 तासात कशामुळे मवाळ झाले? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल अजूनही चर्चा झालेली नाही. त्यामुळे जेव्हा चर्चा होईल तेव्हा याबाबतचा निर्णय घेऊ असं उद्धव म्हणाले.केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला भाजपचा पुन्हा ठेंगा
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि धुळ्याचे खासदार सुभाष भामरेंची वर्णी लागला. मात्र या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला काहीच न मिळाल्यामुळे ‘मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही. शिवसेना स्वाभिमानी पक्ष आहे. जे हक्काचं आहे ते घेणार’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सोमवारी सूचक प्रतिक्रिया दिली होती.राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला, 9 मंत्र्यांचा शपथविधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)