CM Uddhav Thackeray Live : मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Sabha Live : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्रासह राज्याबाहेरुनही अनेक शिवसैनिक सभास्थळी आले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jun 2022 08:54 PM
सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली? : उद्धव ठाकरे

एक जमाना होता की देशाच्या कानाकोपर्‍यात शिवसेना-भाजप राजकारणात अस्पृश्य होतो, कारण हिंदुत्ववादी. 25-30 वर्षे तुम्हीं आमचा उपयोग करुन घेतला आणि सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली?

Uddhav Thackeray Sabha : 25 वर्षे जे वैरी होते त्यांनी आम्हाला  मानसन्मान दिला. 

Uddhav Thackeray Sabha : 25 वर्षे मांडीवर होते, ते आता उरावर  बसले आहे. जे मित्र होते ते आता हाडवैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले.  25 वर्षे जे वैरी होते त्यांनी आम्हाला  मानसन्मान दिला. 

Uddhav Thackeray Sabha : घराबाहेर पडताना देश हाच आपल्या प्रत्येकाचा धर्म

बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष कधी केला नाही. दुसऱ्या धर्मांचा आदर करणे ही आम्हाला महाराजांनी दिलेली शिकवण आहे. प्रत्येकाने आपला धर्म हा घरात ठेवावा. घराबाहेर पडताना देश हाच आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे. 

Uddhav Thackeray : मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Sabha : नामर्दांच हिंदूत्व तुम्ही आम्हाला शिकवू नका. मर्द असाल तर आधी काश्मिरी पंडितांची रक्षा करा. बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी या उपस्थित केला

Uddhav Thackeray Sabha : बाळासाहेबांनी दिलेले वचन पूर्ण करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Sabha : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले वचन आहे. ते मी कधीही विसरणार नाही ते केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. या शहराचे जेव्हा नामांतर करेल पण या संभाजी महाराजांनी देखील आदर्श वाटेल असेल नगर मी करणार आहे. 

Uddhav Thackeray Sabha : संभाजीनगरला पाणी देण्याचे प्रशासनाला आदेश : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Sabha : गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीनगरचा पाणीप्रश्न बिकट होता. संभाजीनगरमध्ये 1972 सालची पाण्याची जुनी योजना सुरू करणार आहे. पाणी योजनेसाठी निधी पुरवणार आहे.   कंत्राटदाराने हयगय केली तर दया, माया दाखवणार नाही. एकही रूपया कमी पडू देणार आहे

Udhhav Thackeray Sabha : सहा महिन्यांनी मुंबईबाहेर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Aurangabad Sabha : शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी मुंबईबाहेर आलो आहे. सर्वात अगोदर बाळासाहेबांचे प्रिय शहर संभाजीनगरामध्ये आलो आहे.

Sanjay Raut Live काश्मिरी पंडितावर हल्ले होत आहे : संजय राऊत

Sanjay Raut Live:  संपूर्ण काश्मीर खोरे आणि काश्मीरमधील हिंदू उद्धव ठाकरेंकडे आशेने बघत आहे. काश्मिरी पंडितांना आधार देण्याचे काम बाळासाहेब ठाकरेंनी केले होते. सातत्याने शिवसेनेवर हल्ले होत आहे हे थांबायला हवे.

Sanjay Raut : दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारी ही लाट

Sanjay Raut : मराठवाड्यात खूप दिवसांनी विराट सभा झाली आहे. समुद्राच्या लाटा उसळाव्या अशी ही गर्दी आहे. ही उसळलेली लाट महाराष्ट्राला नव्हे तर दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारी ही लाट आहे. 

पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्यांनी औरंगाबादसाठी काय केलं? : चंद्रकांत खैरे

पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्यांनी औरंगाबादसाठी काय केलं? भाजपकडून फक्त शिसेनेला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्यांनी औरंगाबादसाठी काय केलं? : चंद्रकांत खैरे

पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्यांनी औरंगाबादसाठी काय केलं? भाजपकडून फक्त शिसेनेला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

औरंगाबादसाठी 50 वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात दिला : अब्दुल सत्तार

औरंगाबादसाठी 50 वर्षात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात दिला, अशी माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. 

UddhavThackeray  : औरंगाबाद विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल  

 औरंगाबाद विमानतळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरूवात होणार आहे. 

Shivsena Aurangabad Sabha : शिवसेनेच्या औरंगाबादमधील आजच्या सभेची तयारी पूर्ण

Aurangabad Sabha :  शिवसेनेच्या औरंगाबादमधील आजच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसलीय. राज ठाकरेंची सभा झाली त्याच मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणारी ही सभा विक्रमी व्हावी यासाठी शिवसैनिक झटतायत. सभेच्या व्यासपीठावर प्रथमच छत्रपती संभाजीराजेंचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आलाय. सभा यशस्वी व्हावी यासाठी शहरातल्या खडकेश्वर मंदिरात पूजाही करण्यात आली. संपूर्ण शहरात वातावरण निर्मिती करण्यात आलीय. 

Uddhav Thackeray Sabha Live  : औरंगाबाद येथे शिवसेना-भाजपमध्ये बॅनरवॉर

Uddhav Thackeray Sabha Live  : औरंगाबाद येथील प्रमुख चौकात भगवे झेंडेही लावण्यात आलेत. याशिवाय शहरात बॅनरली लावण्यात आलेत. शिवसेनेच्या बॅनरजवळ भाजपनंही बॅनर लावून काही प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये बॅनरवॉरही रंगलंय.

पार्श्वभूमी

Shiv Sena CM Uddhav Thackeray Rally Today : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. तब्बल 15 अटी शर्थींसह मुख्यमंत्र्यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये (Aurangabad) 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीपासूनच औरंगाबादच्या नामांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसेच, आजच्या सभेत मुख्यमंत्री औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. 


आजच्या सभेतच मुख्यमंत्री औरंगाबाद शहराच्या नामांतराची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया मुख्यमंत्र्यांकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. आज मुख्यमंत्र्यांची सभा औरंगाबादमधील ज्या मैदानावर पार पडणार आहे, त्याच मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. तर 8 मे 1988 मध्ये याच मैदानावर बाळासाहेबांनी पहिल्यांदाच औरंगाबादच संभाजीनगर म्हणून उल्लेख केला होता. तेव्हापासून शिवसेनेचे सर्वच नेते संभाजीनगर असाच उल्लेख करतात. त्यामुळे बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादच्या सभेत 'संभाजीनगर'ची (Sambhajinagar) घोषणा करू शकतात, असं म्हटलं जात आहे.  


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आजच्या सभेसाठी औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. या सभेच्या निमित्तानं आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे, सभेच्या स्टेजसमोर उभारण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा. शिवसेनेच्या सभेत पहिल्यांदाच संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या सभेत औरंगाबादचं नामांतर करत संभाजीनगर झाल्याची मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याची शक्यता आणखी दाट झाली आहे. 


निवडणूक आणि नामांतराचा मुद्दा... महत्त्व काय? 



निवडणुका आल्या की महाराष्ट्रात एक विषय हमखास चर्चिला जातो. आणि तो इतका हॉट आणि हिट होतो, की तिच्यावर सगळेच राजकीय नेते एकमेकांकडे बोट दाखवून बोलायला लागतात. तो विषय म्हणजे संभाजीनगर की औरंगाबाद. आगामी महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे औरंगाबादची निवडणूक नामांतराच्या मुद्याशिवाय होऊच शकत नाही. अनेक वर्षे या मुद्यावरून महापालिकेत शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणात सुद्धा नामांतराच्या विषय आघाडीवर असण्याची शक्यता आहे.


सभेसाठी 'या' अटी-शर्थी :


जाहीर सभा ठरलेल्या वेळेतच आयोजीत करावी. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करु नये.
कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये, अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. सभेला येताना आणि परत जातांना कोणीही घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी.
सभेसाठी येतांना अथवा परत जातांना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये.
कार्यक्रमा दरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये अथवा प्रदर्शन करु नये. तसेच शस्त्र अधिनियमातील तरतुदीचा भंग करु नये.
सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये. अशा प्रकारे क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार घरले जाईल.
सभेसाठी वापरण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपका बाबत मा. सर्वोच्च न्यायालय निर्देश व ध्वनिप्रदुण (नियंत्रण आणि नियमन ) प्रमाणे आवजाची मर्यादा असावी.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आयोजकांमार्फत कायदा व सुव्यस्थेस कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील,यासह एकूण 15 अटीशर्तींसह सभेला परवागनी देण्यात आली आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.