एक्स्प्लोर

...तर मुख्यमंत्र्यांना हार घालेन, भास्कर जाधव म्हणाले मुख्यमंत्र्यांची 'ती' शपथ वाया जाऊ नये!

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यात मराठा आरक्षणावरुन खडाजंगी रंगली.

नागपूर :  मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation)  सध्या राज्यात वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)  आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांमध्ये (Sanjay Shirsath)  आरक्षणावरून खडाजंगी रंगली आहे. मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हार घालेन, मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश येऊ दे, त्यांची शपथ वाया जाऊ नये,असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केले आहे. तर भास्कर शेठना चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ, असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलं.

भास्कर जाधव म्हणाले, मराठा समाजाला या अधिवेशनात आरक्षण दिलं तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हार घालेल. सरकार तिघाचं असलं तरी मुख्यमंत्र्यांना हार घालणार आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. अनेक गरजूंना मदत, मेहनती आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहे. आरक्षण दिल्यावर श्रेयवादाची लढाई होईल पण मी शिंदे साहेबांचा सत्कार करेल.  मुख्यमंत्र्यांच्या हाताला यश येऊ दे, त्यांची शपथ वाया जाऊ नये ही इच्छा आहे.

भास्कर जाधवांचे  मुख्यमंत्र्यांवर प्रेम आहे:  संजय शिरसाट 

संजय शिरसाट  म्हणाले, आम्ही मराठा समाजासाठी काम करत आहे. आम्ही दाखले द्यायला सुरुवात केली, आधी काहीच होत नव्हतं . भास्कर जाधव माझे मित्र आहेत त्यांना चिंता आहे पण आम्ही आरक्षण देऊ . आम्ही आरक्षणाला लागणारा डेटा  तयार करत आहोत.  भास्कर जाधवांचे  मुख्यमंत्र्यांवर प्रेम आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास : भास्कर जाधव 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देणार असं आश्वासन दिलं आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर निर्णय घेतील आमचा विश्वास आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले. 

सर्वपक्षीय आमदारांचं पायऱ्यांवर फोटोसेशन

विधानभवनात आज फोटोसेशनच्या वेळी सर्व पक्षाचे आमदार एकत्रित पाहायला मिळाले. एवढंच नाही तर या फोटोसेशनच्या वेळी अगदी खेळीमेळीचे वातावरण  होतं. यादरम्यान काही हास्यविनोद सुद्धा झाले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे हेवेदावे विसरुन, सर्व आमदार खेळीमेळीत पाहायला मिळाले. शिवसेना कुणाची यावरून सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे.मात्र  या फोटोसेशननंतर एकमेकांना भिडणारे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्येही वेगळं चित्र पाहायला मिळालं.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू या दोघांमध्ये हास्यविनोद पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसताना दिसले. त्यावेळी बाजूला देवेंद्र फडणवीस, आमदार संतोष बांगर उपस्थित होते.

हे ही वाचा :

Bhaskar Jadhav : भुजबळांवर तुटून पडले, मराठा आरक्षणासाठी एकहाती लढले; भास्कर जाधवांचे विधानसभेतील घणाघाती भाषण

महत्त्वाच्या बातम्या

जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
Embed widget