एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांना भेट नाकारली
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार होते. मात्र उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली आहे.

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन शिवसेना आणि भाजपात तणाव वाढला आहे. या प्रकल्पाच्या विकास करारावर स्वाक्षरी झाली आहे. यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार होते. मात्र उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली आहे.
नाणारच्या प्रकल्पाचा शिवसेनेचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी आपण त्यांची भेट घेऊ असं धर्मेंद्र प्रधान यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सांगितलं होतं. मात्र आता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशाला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली.
धर्मेंद्र प्रधान यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठीची उद्यासाठीची वेळ मागितली होती.
‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर आणि संयुक्त अरब अमीरात (युएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला.
प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्य
जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प
जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना
वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता
पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी
दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी
भारतात एवढी मोठी गुंतवणूक कशामुळे?
इतर तेल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच एडनॉक आणि सौदी अरामकोलाही भारतात आपली पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते. 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली.
संबंधित बातम्या :
नाणार प्रकल्पासाठी सरकार एक पाऊल पुढे, आणखी एका कंपनीशी करार
कोकणात ‘नाणार’ काही होत नाही, आम्ही तो घालवलाय : उद्धव ठाकरे
आणखी वाचा























