एक्स्प्लोर
भ्रष्टाचार रोखा, नाहीतर लोक घरात घुसून मारतील, उदयनराजेंचा इशारा
कोल्हापूर : भ्रष्टाचार रोखा, नाहीतर लोक घरात घुसून मारतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भ्रष्टाचारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधिंना दिला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
काही दिवसांपूर्वीही खासदार उदयनराजे भोसलेंनी भ्रष्टाचाऱ्यांवर शरसंधान साधलं होतं. “धरणं, कालवे भ्रष्टाचाराने भरल्यानेच शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली”, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
शिवाय, “ज्यांना आपण धुतल्या तांदळासारखे असल्याचं वाटतं, त्यांनी सुरक्षेशिवाय रस्त्याने फिरून दाखवावं. हिम्मत असेल तर एकट्याने रस्त्यावरून जावं, मग बघा लोकांच्या मनात तुमच्याबद्दल किती राग आहे. मी एकटाच सगळीकडे फिरतो, मी नैतिकता पाळली आहे, तुम्ही अशी नैतिकता पाळून दाखवा, असं चॅलेंज देतो”, असंही काही दिवसांपूर्वी उदयनराजे म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement