एक्स्प्लोर

मोठी बातमी : उदयनराजे भोसलेंनी घेतली फडणवीसांची भेट; साताराच्या उमेदवारीवरून घडामोडींना वेग

Udayanraje Bhosale Met Devendra Fadnavis : भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत उदयनराजे यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.

Udayanraje Bhosale Met Devendra Fadnavis : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) मंगळवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आहे. भाजपकडून उमेदवारांच्या (BJP Candidate) आतापर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यात उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. त्यामुळे उदयनराजे नाराज असल्याची चर्चा होती. अशात आता उदयनराजे भोसलेंनी फडणवीसांची भेट घेतली असून, या भेटीत देखील याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. त्यातच भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत उदयनराजे यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची भेट घेतली होती. तर, उदयनराजे देखील नाराज असल्याची चर्चा होती. याचवेळी आता फडणवीस आणि उदयनराजे यांची भेट झाली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली नसली, तरीही सातारा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. 

उदयनराजे समर्थक नाराज...

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत उदयनराजे यांचे नाव नाही, त्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा दौऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीवर कोणतेही स्पष्ट संकेत दिले नव्हते. या सर्व घडामोडींमुळे उदयनराजे समर्थक प्रचंड नाराज आहेत. तर, संतापलेल्या  उदयनराजे समर्थकांनी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना घेराव घालत जाब देखील विचारला होता. भाजपच्या पहिल्या यादीत उदयनराजे यांचे नाव नसने म्हणजेच हा छत्रपतीच्या गादीचा अपमान असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलवून दाखवली आहे. अशात आता फडणवीस आणि उदयनराजे यांची भेट झाली आहे. 

फडणवीसांच्या बैठकांवर बैठका...

लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासह उमेदवारीवरून महायुतीमध्ये अनेक घडामोडी घडतांना पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाराजांची संख्या देखील मोठी असल्याचे दिसत आहे. अशात फडणवीसांकडून याबाबतीत बैठकांवर बैठका घेण्यात येत आहेत. जागावाटपाचा मुद्दा असो किंवा एका जागेवर दोघांची उमेदवारीच्या दाव्याचा मुद्दा असो यावर तोडगा काढण्यासाठी फडणवीसांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे फडणवीसांची भेट घेणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Udayanraje Bhosale : बाकी तिकिटाचं माहीत नाही, मी संन्यास घेतलेला नाही! उदयनराजें भोसलेंच्या मनात आहे तरी काय?

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Devendra Fadnavis: नीट पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
NEET पेपरफुटी आंदोलनातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश
Maharashtra Weather Updates: समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!
समुद्रातील तापमान वाढलं, उंच ढग तयार होत राहिले; कमी वेळेत जास्त पाऊस का कोसळतोय?, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी A टू Z सांगितलं!
Maharashtra Weather Updates: नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट
नागपुरात मुसळधार, गोंदिया, भंडाऱ्यात धो धो; विदर्भात अचानक पावसाचा जोर का वाढला?, A टू Z अपडेट

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget