एक्स्प्लोर

एकाच रात्रीत दोन हत्या, नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा

पहिली घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत वडधामना परिसरात काल संध्याकाळी घडली. तर जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत मंगळवारी आठवडी बाजारात दुसरी घटना घडली.

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या करण्यात आली आहे. एका घटनेमागे अवैध दारू विक्रीचा वाद, तर दुसऱ्या घटनेमागे जुनं वैमनस्य कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागपुरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पहिली घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत वडधामना परिसरात काल संध्याकाळी घडली. अजय रामटेके या 28 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. अजयला त्याच्याच मित्रांनी नागपूर-अमरावती महामार्गापासून हाकेच्या अंतरावर एका निर्जन ठिकाणी धारदार शस्त्रांनी जीवे मारलं. अजय रामटेके आणि त्याचा मित्र राहुल वंजारी दोघे खानावळ चालवायचे. त्याच ठिकाणी दोघे अवैधरित्या ग्राहकांना दारुही उपलब्ध करून द्यायचे. त्याच दारू विक्रीच्या पैशाचा दोघांमध्ये वाद होता. घटनेच्या एक दिवस आधीही दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र काल संध्याकाळी राहुलने काही अज्ञातांच्या मदतीने अजयचा पाठलाग केला आणि निर्जन ठिकाणी गाठून त्याची हत्या केली. या घटनेत अजून कुणालाही अटक झालेली नाही. दुसरी घटना जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत मंगळवारी आठवडी बाजारात घडली. समीर उर्फ सोनू शाह नावाच्या 20 वर्षीय युवकाला भर बाजारात तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी जीवे मारलं. समीर शाहचे ऋषभ खापेकर, फय्याज शेख आणि एका अल्पवयीन मुलासोबत जुनं वैमनस्य होतं. त्यामुळे त्यांच्यात गेल्या वर्षीपासून नेहमीच खटके उडायचे. अनेकदा वाद पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचले होते. कधीतरी समीर शाह आपल्यावर हल्ला करून जीवे मारेल, या भीतीने ग्रस्त असलेल्या ऋषभ खापेकर, फय्याज शेख आणि अल्पवयीन मुलाने काल रात्री बाजारातच समीर शाहची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकरांनी फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Embed widget