एक्स्प्लोर

अहमदनगरमध्ये कुरिअर पार्सल बॉक्सचा स्फोट, दोन जण जखमी

अहमदनगरमधील माळीवाड्यातील मारुती कुरिअरमध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. शहरातील मध्यवस्तीत पार्सलमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली.

अहमदनगर : कुरिअर पार्सलच्या बॉक्समध्ये भीषण स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. अहमदनगरमधील माळीवाड्यातील मारुती कुरिअरमध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. शहरातील मध्यवस्तीत पार्सलमध्ये स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या वेळी कुरिअरच्या ऑफिसमध्ये तीन जण काम करत होते. मात्र या स्फोटात संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर हे जखमी झाले. संदीपच्या चेहर्‍याला दुखापत झाली, तर संजयच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्यात. दोघांवर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोट झाल्याने सर्वत्र रक्ताचे डाग उडाले असून कार्यालयातील समान अस्ताव्यस्त फेकलं गेलं. पायर्‍यांवरील रक्ताच्या डागांवरुन स्फोटाची दाहकता समोर येते. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक घाबरुन त्वरित घराबाहेर पडले. कुरिअरच्या पार्सलमधील स्पीकरच्या पाईपमध्ये पांढर्‍या रंगाची पावडर होती. या पांढर्‍या रंगाच्या पावडरचा स्फोट झाल्याने दोघांना दुखापत झाली. स्फोटाने संजय क्षीरसागरच्या हाताच्या बोटात आणि पायात पाईपचे धातू घुसले आहेत. पार्सल अहमदनगरवरुन पुण्याच्या पत्त्यावर पाठवलं जात होतं. मात्र पाठवणाराचा पत्ता बनावट असल्याची माहिती आहे. त्यामुळे पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीच्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. यावेळी बॉम्ब शोध पथक, श्वान पथक आणि फॉरेन्सीकने पाहणी केली. काही नमुनेही ताब्यात घेण्यात आले आहेत. दरम्यान एटीएसचं पथकही येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता हे पार्सल कुणी कुणाला पाठवलं, याबाबतचा तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget