एक्स्प्लोर
दोन क्रिकेटर्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
एकाच दिवशी दोन क्रिकेटर्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पणजी/नवी मुंबई : एकाच दिवशी दोन क्रिकेटर्सचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गोव्याचा माजी रणजीपटू राजेश घोडगे (44) याचा मैदानावर खेळत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तर नवी मुंबईतल्या घणसोली येथील क्रिकेट खेळाडू संदीप म्हात्रे याचादेखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
मडगाव क्रिकेट क्लबने क्लबच्या सदस्यांसाठी आयोजित केलेल्या सामन्यात राजेश खेळत होता. त्यावेळी नॉन स्ट्राईकवर असताना राजेशला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तो खेळपट्टीवरच कोसळला. सामन्याच्या वेळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. परंतु राजेशची प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे त्याला इएसआय रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचारानंतर पुन्हा त्याला खासगी रुग्णालयात हलवले. खासगी रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.
राजेशने मडगाव क्रिकेट क्लबकडून राज्यस्तरावर अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. गोव्यातर्फे राजेशने 1999-2000 दरम्यान दोन सामने खेळले आहेत. तडाखेबाज फलंदाज म्हणून तो प्रसिद्ध होता. चार दिवसांपूर्वी गोवा क्रिकेट असोशिएशनच्या स्पर्धेत खेळताना त्याने अर्धशतक झळकावले होते.
तर दुसरीकडे नवी मुंबईतील घणसोली मधील संदीप म्हात्रे हा क्रिकेट खेळाडू एका टुर्नामेंटमध्ये खेळत होता. तो गोलंदाजी करत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागले. त्याने कसेबसे त्याचे षटक पूर्ण केले. त्यानंतर तो सामना अर्धवट सोडून घरी गेला. घरी त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये तो मृत पावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
