एक्स्प्लोर
अश्लील फोटोंवर मुलींचा चेहरा लावून ब्लॅकमेलिंग, दोघांना अटक
नाशिक : अश्लील फोटोंना मुलींचा चेहरा लावने, तसेच अश्लील व्हिडिओ बनवून मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकमधील ही घटना आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा गेल्या काही दिवसांपासून शोध सुरु होता.
मुलींना अश्लील व्हिडिओ बनवण्याची धमकी देत 5 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी 11 फेब्रुवारी 2017 रोजी नाशिकच्या उपनगर पोलिस स्टेशनला 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सुरु असताना आज (01 मार्च) अखेर जयंत झांबरे आणि राकेश पवार या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
जयंत झांबरे हा नाशिकच्या इंदिरानगरमधील तर राकेश पवार हा नवी मुंबईतील ऐरोलीचा रहिवासी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement