उस्मानाबाद : तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेचे शुल्क वाढविण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी घेतला आहे. यामध्ये श्रीखंडाच्या सिंहासन पूजेचे शुल्क एक हजार रुपयांवरून एक हजार 500 रुपये, तर दह्याच्या सिंहासन पूजेचे शुल्क 900 रुपयावंरून एक हजार 200 रुपये करण्यात आले आहे. यापूर्वी 29 जुलै 2017 रोजी मंदिर संस्थानने पूजेची शुल्कवाढ केली होती.

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांची शनिवारी (18 जानेवारी) सकाळी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीत जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, आदींची उपस्थिती होती. या बैठकीत पूजेच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. विश्वस्तांनी त्यास मंजुरी दिली आहे.

असे असतील पूजेचे नवीन दर
अभिषेक पूजा - प्रति व्यक्ती 20 रुपये
सिंहासन पूजा श्रीखंड - 1500 रुपये  (जुने दर 1000 रुपये )
दही अभिषेक पूजा - 1200 रुपये  (900 रुपये )
अभिषेक पूजा - 50 रुपये (केवळ 2 माणसांसाठी) अधिकच्या व्यक्तीसाठी 20 रुपये

व्हिडीओ पाहा : Tulja Bhavani Temple | तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजा शुल्कात दीडपटीने वाढ | ABP Majha



Tuljapur Jewelry Theft | तुळजाभवानीच्या तिजोरीतले दागिने, पुरातन नाणी गायब! | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha



कुलस्वामिनी तुळजाभवानीचा डोळे दिपवणारा अद्भुत खजिना

तुळजाभवानीचे दागिने पुन्हा गायब; मंदिर समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचं कृत्य

महिलांकडून पहिल्यांदाच तुळजाभवानीचा चरणस्पर्श, घटनेने खळबळ