उस्मानाबाद : शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा वाद ताजा असतानाच तुळजापूर शहरातील काही महिलांनी तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श केल्याने खळबळ उडाली आहे. तुळजापूर आतल्या तुळजाभवानीला आजवर महिलांना चरण स्पर्श करू दिला जात नव्हता. या घटनेमुळे तुळजापुरात खळबळ उडाली आहे आजवर एकाही स्त्रीने गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले नव्हते. अगदी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना सुद्धा परवानगी दिली नव्हती.
या संदर्भात काही महिला जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटल्या. मंदिर संस्थांच्या कुठल्या रेकॉर्ड किंवा नियमात हे आहे का? याची विचारणा केली. त्यासंदर्भात नियम नाहीत हे लक्षात आल्यानंतर काल रात्री या महिला मंदिराच्या गर्भगृहात घुसल्या आणि देवीचा चरणस्पर्श केला.
शबरीमला मंदिरात प्रवेशाचा वाद ताजा
शबरीमला मंदिरात नुकतेच दोन महिलांच्या प्रवेशाची घटना ताजी असताना गुरुवारी श्रीलंकेतून आलेल्या एका महिलेने शबरीमला मंदिरात प्रवेश करत अयप्पाचे दर्शन घेतले होते. शबरीमला मंदिरात प्रवेशबंदीची शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढत अयप्पाचे दर्शन घेतल्याची ऐतिहासिक घटना घडल्यानंतर केरळमध्ये हिंसाचार उसळला होता. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. 10 आणि 50 वर्षांच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी दिला होता. मात्र या आदेशानंतरही आतापर्यंत कोणत्याही 'प्रतिबंधित' वयाच्या महिलांनी अयप्पाचं दर्शन घेतलेलं नाही. अनेक महिला कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु मोठ्या विरोधामुळे त्यांना प्रवेश करता आला नाही.
बुधवारी दोन महिलांनी अयप्पा दर्शनाचा अधिकार बजावला. या ऐतिहासिक घटनेनंतर गुरुवारी केरळमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. शबरीमला कर्म समिती व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले होते.
महिलांकडून पहिल्यांदाच तुळजाभवानीचा चरणस्पर्श, घटनेने खळबळ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jan 2019 02:06 PM (IST)
शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचा वाद ताजा असतानाच तुळजापूर शहरातील काही महिलांनी तुळजाभवानी देवीचा चरणस्पर्श केल्याने खळबळ उडाली आहे. तुळजापूर आतल्या तुळजाभवानीला आजवर महिलांना चरण स्पर्श करू दिला जात नव्हता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -