1. आजपासून शिर्डीत बेमुदत बंद, पाथरीला साईबाबांचं जन्मस्थळ घोषित करण्यास तीव्र विरोध, तर सोमवारी मुख्यमंत्र्यांची पाथरीवासियांसोबत बैठक
2. गुलाबी थंडीतही मुंबई मॅरेथॉनला मोठा प्रतिसाद, देशविदेशातल्या 55 हजाराहून अधिक धावपटूंचा सहभाग
3. इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलसाठी द्या, प्रकाश आंबेडकरांची मागणी
4. डॉ.आंबेडकरांचं 22 वर्षे वास्तव्य असलेल्या परळमधल्या बीआयटी चाळीत स्मारक उभारणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
5. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमान तुरुंगात पाठवा, काँग्रेसला इशारा देणाऱ्या राऊतांची नंतर सारवासारव, भाजप मनसेकडून सेनेवर टीका
6 मेगाभरतीमुळं पक्षाची संस्कृती बिघडल्याचं विधान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांचं घूमजाव, इतर पक्षातले नेते आल्यानं फायदा झाल्याचं स्पष्टीकरण
7. फक्त कलाकारांनीच भूमिका का घ्यायची? सामान्य माणसांनीही भूमिका घ्यावी, माझा कट्ट्यावर अभिनेते अतुल कुलकर्णींचं मत
8. औरंगाबादमध्ये टोळक्याकडून गतीमंद मुलीचा विनयभंग आणि मारहाण, व्हीडीओ व्हायरल, सर्व स्तरातून तीव्र संताप, एक आरोपी गजाआड
9. कारच्या अपघातात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी जखमी, खालापूर टोलनाक्याजवळ दुर्घटना, आझमींवर रूग्णालयात उपचार सुरू
10. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरुमध्ये तिसरी निर्णायक लढत, मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघांमध्ये काँटे की लढत