Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुलस्वामिनी तुळजाभवानीचा डोळे दिपवणारा अद्भुत खजिना
अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी... स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुळजापूर भेटीचे अनेक दाखले दिले जातात. पण तसा संबंध दाखवणारे ऐतिहासिक दस्त उपलब्ध नाहीत. मात्र 'एबीपी माझा'ने तुळजाभवानीचा असा एक महत्त्वाचा अलंकार शोधला आहे, जो थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं सांगतो. करोडो रुपये किंमत असलेला हा दागिना 'माझा'च्या टीमला तुळजाभवानीच्या गुप्त खजिन्यात सापडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळजाभवानीच्या गुप्त खजिन्यात एकूण सात पेट्या आहेत. गुप्त कळ दाबल्याशिवाय गुप्त खजिना उघडत नाही. खजिन्याच्या खोलीत चिटपाखरुही जाऊ शकत नाही. खजिना पुरातन दागिन्यांच्या पेट्यांनी भरुन गेला आहे. पेट्यांमध्ये शेकडो वर्ष जुने अलंकार आहेत. प्रत्येक अलंकारात माणिक, मोती, पाचू, हिरे आहेत. आजच्या घडीला त्याची किंमत हजारो कोटींच्या घरात असेल.
खजिन्यातील प्रत्येक दागिन्याला एक इतिहास आहे. अलंकाराच्या पहिल्या क्रमांकाच्या पेटीत देवीच्या वर्षभर चालणाऱ्या सोहळ्यांसाठीचे अलंकार असतात. एक एक अलंकार चढवत शेवटी देवीचा मुकूट सजतो.
तुळजाभवानीच्या खजिन्यात शतकानुशतके स्त्रिया जे अलंकार घालायच्या तेवढे सगळे अलंकार आहेत. सात पदरी जवस माळ, अस्सल 53 हिऱ्यांची माळ. देवीचे अलंकार 12 बाय 9 इंच आकाराच्या प्राचीन सुबक पेट्यात ठेवले जातात. पेट्यांना दोन्ही बाजूंनी पकडण्यासाठी कानकोंडा आहे.
देवीच्या खजिन्यात 41 नेत्रजोड आहेत. मुकूट पाच शतकांपेक्षा जुना आहे. त्यावर मोत्याचा तुरा. मध्यभागी पुष्कराज हिरा. चारी बाजूने माणिक. असा माणिक मोत्यांचा शिरपेच. मुकुटावर हिऱ्यांची महादेवाची पिंड. पिंडीत हिरकणींची बेलाची पानं. शेकडो वर्षापासून स्त्रिया घालायच्या तेवढी कर्णफुलं देवीला आहेत.
महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचा हा खजिना डोळे दिपवणारा आहे. आजच्या घडीला त्याची किंमत हजारो कोटींच्या घरात असेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -