एक्स्प्लोर

अटक टाळण्यासाठी निलेश राणेंची धावाधाव

रत्नागिरी: काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चिपळूणचे काँग्रेस तालुकाअध्यक्ष संदीप सावंत यांना मारहाणप्रकरणी निलेश राणेंचा अटकपूर्व जामीन खेडच्या न्यायालयानं फेटाळला आहे. तर सावंत यांना मारहाण करणाऱ्या 4 आरोपींना न्यायालयानी कोठडी सुनावण्यात आली आहे.   त्यामुळे या प्रकरणात आता निलेश राणे यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   दरम्यान खेड न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर निलेश राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी याचिका दाखल केली आहे.   किरकोळ मतभेदातून निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी रात्री आपल्या घरात घुसून आपल्याला मारहाण केली अशी तक्रार सावंत यांनी दाखल केली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या सावंतांवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.   यानंतर खुद्द नारायण राणेंनी सावंत यांची भेट घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता..पण त्यात फार काही यश आलं नसल्याचं सध्या तरी दिसून येतंय.   काय आहे प्रकरण? मराठा आरक्षणासाठी रत्नागिरीमध्ये गेल्या रविवारी निलेश राणे यांची सभा होती. परंतु या सभेला संदीप सावंत कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले नाहीत. याच रागातून संदीप सावंत यांना चिपळूणजवळच्या घरातून मुंबईला नेण्यात आलं, तसंच प्रवासादरम्यान गाडीत मारहाण केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.   स्वत: निलेश राणे यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांना धमकी दिल्याचाही आरोप आहे.   संदीप सावंत यांच्या पत्नीचा दावा दरम्यान, संदीप सावंत यांनीही  काय प्रकार घडला याबाबतची माहिती माध्यमांना दिली. “स्वत: निलेश राणे आणि त्यांचे बॉडिगार्ड आमच्या घरी आले. त्यावेळी आम्ही जेवत होतो. निलेश राणेंनी संदीप यांना खाली येण्यास सांगितलं. त्यानंतर खाली गेल्यावर त्यांना मारहाण करुन गाडीत घालून घेऊन गेले,” असं संदीप सावंत यांच्या पत्नीने सांगितलं.   यानंतर रात्रभर संदीप सावंत यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा फोन लागत नव्हता. पहाटे पाचच्या सुमारास आमदार नितेश राणेंना फोन केला. मग राणेसाहेबांच्या पत्नीला फोन केला, त्यांनी थोड्यावेळानंतर संदीप घरी पोहोचतील असं सांगितल्याचं संदीप सावंत यांच्या पत्नी म्हणाल्या.   निलेश राणेंची प्रतिक्रिया दरम्यान, ही माझ्याविरुद्ध राजकीय खेळी असल्याची प्रतिक्रिया निलेश राणेंनी दिली आहे. तसंच संदीप सावंत 10 लाख रुपये मागत होते. पैसे दिले नाहीत म्हणून आरोप करत असावेत, असंही निलेश राणे म्हणाले.   संदीप आमचा कार्यकर्ता, आम्ही आमचं बघून घेऊ : नारायण राणे दरम्यान संदीप सावंत हा आमचा कार्यकर्ता असून, आम्ही आमचं बघून घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिली. नारायण राणे यांनी 27 एप्रिलला ठाणे रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या संदीप सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संबंधित बातम्या निलेश राणेंवर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा संदीप आमचा कार्यकर्ता, आम्ही आमचं बघून घेऊ : नारायण राणे

संदीप सावंतांना कुठलीही मारहाण नाही, नारायण राणेंचा दावा

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget