एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या

हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे तर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातीलच आपण एक आहोत, असं म्हणत आडत व्यापाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

उस्मानाबाद : सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे दरात सातत्याने घसरण होत आहे. हमीभाव, कर्जमाफी, फुकट बियाणे, शेततळे अशा घोषणांमुळे तर शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातीलच आपण एक आहोत, असं म्हणत अडत व्यापाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शुक्रवारची ही घटना आहे. दत्तात्रय गुंड असं या 32 वर्षीय व्यापाऱ्याचं नाव आहे. तरुण अडत व्यापार्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्यावर्षी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केलेला 800 क्विंटल हरभरा पडून असल्याचंही दत्तात्रय गुंड यांनी म्हटलं आहे. दत्तात्रय गुंड यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. ''सर्व व्यापारी आणि शेतकरी तुम्हाला चोर दिसतात. म्हणून तर त्या दोघांत भांडणे लावून आपण पाहत बसला आहात. आतापर्यंत व्यापार्‍यांनीच तारल्यामुळे शेतकरी जिवंत होता. नुकतेच जीवन चालू झाले होते. तुमच्या सरकारी धोरणाने आणि दुष्काळाने ते संपवलं आहे. आपल्या धोरणामुळे हा शेतकरी कायमचा संपावर जात आहे. आणखी कितीजण याच वाटेने जाणार, याची वाट पाहू नका. निर्णयात बदल करुन शेतकरी आणि व्यापारी दोन्ही जगवा,'' असं गुंड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या दरम्यान, या चिठ्ठीत गुंड यांनी अत्यंत भावनिक शब्दात माफी मागितली आहे. ''सरकारची धोरणे, खासगी कर्ज आणि त्याच्या व्याजाला कंटाळून आत्महत्या करत आहे. कुटुंबीयांना त्रास देऊ नये,'' असंही दत्तात्रय गुंड यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सधन असताना डोक्यावर वाढलेला कर्जाचा ताण आणि शासनाच्या धोरणाचा फटका आपल्या मुलाला अशा वाईट निर्णयापर्यंत घेऊन गेला, याचे दुःख सरपंच असलेल्या त्यांच्या आईला लपवता आलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या दत्तात्रय गुंड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. या प्रकरणातील सावकार शोधून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी गुंड यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठी लिहून अडत व्यापाऱ्याची आत्महत्या

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passes Away: 'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
'करारी अभिनेता आपण गमावला!' नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातूनही शोक; शरद पवारांसह दिग्गज नेते भावूक, कोण काय म्हणालं?
Dharashiv News: दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
दुधातून पाणी वेगळं... तेही पिण्यासाठी! दुष्काळी धाराशिवमध्ये खवा उद्योजकाचा भन्नाट 'राजहंस' प्रयोग; पाणी अन् विजेचीही मोठी बचत
Central Railway Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या
प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल कुठपर्यंत धावणार? एक्स्प्रेस किती उशिराने? जाणून सविस्तर घ्या
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget