दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.



इराकच्या इर्बिल शहरात क्षेपणास्त्र हल्ला, अमेरिकन दूतावासावर हल्ल्याचा प्रयत्न, मोसादची ठिकाणंही रडारवर असल्याची माहिती
  
सलग 18व्या दिवशी रशियाचे युक्रेनवर हल्ले, माघार न घेणाऱ्या युक्रेनचे राष्ट्रपती झेलन्सकींची पुतीन यांच्याशी चर्चेची तयारी, इस्त्रायल मध्यस्थीच्या भूमिकेत
 
बदली घोटाळ्याचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी आज फडणवीसांची चौकशी, पोलिसांचं पथक फडणवीसांच्या बंगल्यावर जाणार, तर भाजप राज्यभर पोलिसांच्या नोटीशीची होळी करणार


पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ? पुणे सायबर पोलिसांकडून दोघांना अटक


सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी राजीनामा देणार असल्याचं वृत्त सपशेल खोटं, प्रवक्ते रणदीप सुरजेवालांचं ट्वीट, पाच राज्यातल्या पराभवावर आज काँग्रेसचं मंथन
 
संजय राऊत पुन्हा राज ठाकरेंच्या निशाण्यावर, ठाण्यातील कार्यक्रमात राऊत कुटुंबाच्या ईडी चौकशीवर बोट


कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; 12 एप्रिलला मतदान तर 16 एप्रिलला मतमोजणी


शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडलं! राणे बंधूंविरोधात मुंबईत गुन्हा दाखल 


माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधत त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला होता.  शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडल्या प्रकरणी राणे बंधूंविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस (Mumbai Police) ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


राष्ट्रवादी युवक काँग्रेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या तक्रारी नंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम मुस्लिम तेढ निर्माण करून दंगल घडतील असं भाष्य केल्याची एफआयआर कॉपीत नोंद केली आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत अशी विचारण शरद पवारांना केली. वास्तविकरित्या राजीनामा घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. पण अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं तक्रारीत म्हटलं आहे. 


तक्रारीत म्हटलं आहे की, निलेश राणे यांनी शरद पवार हे दाऊदचा माणूस आणि पाकिस्तानचा एजंट असल्याचं ट्वीट केलं होतं. निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे. खरोखर संशय येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, बॉम्बब्लास्टच्या आरोपींशी व्यवहार केला. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 


नितेश राणे आणि निलेश राण हे जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करुन तेढ निर्माण करत दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने शरद पवारांचं नाव दाऊद इब्राहिमशी जोडून अब्रुनुकसान करत आहेत. तसेच दाऊदशी संबंध जोडल्यानं शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असंही तक्रारीत म्हटलं आहे. 


अरविंद केजरीवाल आज पंजाब दौऱ्यावर, भगवंत मान यांच्यासोबत अमृतसरमध्ये रोड शो


करवीरनिवासिनी अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी ई-पासची गरज नाही, भक्तांसाठी मोठा दिलासा, शिर्डीत दोन वर्षांपासून खंडीत झालेल्या साई परिक्रमेलाही आजपासून सुरुवात