Sindhudurga News Update सिंधुदुर्ग : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी शरद पवार दाऊदचा माणूस आहेत की काय अशी शंका उपस्थित केली आहे. ईडीनं अटक केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलेला नाही. अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा राजीनामा घेतला. नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. 


निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे. खरोखर संशय येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, बॉम्बब्लास्टच्या आरोपींशी व्यवहार केला. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा? असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 


राणे म्हणाले की, जेवढी तत्परता दाखवत खासदार सुप्रिया सुळेंनी नवाब मलिक यांच्याबद्दल काळजी दाखवली ती काळजी अनिल देशमुखांच्या वेळी कुठं गेली होती.  नवाब मलिक खरं बोललं तर शरद पवारांबद्दल माहिती मिळेल काय असं काही आहे का? असा सवालही निलेश राणेंनी केला आहे. नवाब मलिक पवार परिवारासाठी काही स्पेशल आहेत का? नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाहीत, हे पवार साहेब सांगतील. नवाब मलिकांना एवढं का लाडावून ठेवलं आहे, याचं उत्तरही ते देतील असं राणेंनी म्हटलं आहे. 



 



इतर महत्वाच्या बातम्या :


भिंतीवरील घड्याळ भेट दिले अन् त्यात छुपा कॅमेरा बसवला, स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड : प्रवीण चव्हाणांचा आरोप


Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण


Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर