LIVE UPDATES | महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची वर्णी, अजाॅय मेहता यांना मुदतवाढ नाही
मुंबई : काल 24 जून रोजी, चोवीस तासात देशामध्ये 15 हजार 968 रुग्णांची वाढ झाली आहे. तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा 15 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण वाढले आहेत. याआधी, शनिवारी दिवसभरात 15 हजार ४१३ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या चोवीस तासांमध्ये 465 मृत्यू झाले असून एकूण मृत्यू 14 हजार 476 झाले आहेत. कोरोना व्हायरसच्या अपडेटसह अन्य महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
LIVE
Background
Corona Live Update : मोठा गाजावाजा करत आज रामदेवबाबांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध पतंजलीनं तयार केल्याचा दावा केला. मात्र अवघे चार-पाच तास उलटायच्या आतच केंद्रीय आयुष मंत्रालयानं या औषधाची जाहीरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जोपर्यंत या औषधाची नीट चाचपणी होत नाही, तोपर्यंत ही जाहीरात थांबवण्याचे आदेश देण्यात आले.
मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत हरिद्वारमध्ये रामदेवबाबांनी हे औषध जगासमोर आणलं. त्यावेळी हे औषध सगळ्या मेडिकल चाचण्यांनी प्रमाणित असल्याचाही दावा त्यांनी केला. पण या औषधाला नेमकं कुणी प्रमाणित केलं आहे, याबाबत मात्र सगळा सावळागोंधळ आहे. कारण इंडियन मेडिकल कौन्सिलनं याबाबत आधीच कानावर हात ठेवले होते. त्यातच ज्या आयुष मंत्रालयाच्या अधिकारात हा सगळा विषय येतो त्यांनी आता याबाबत पतंजलीकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.
या औषधाची, त्यातल्या प्रमाणांची सर्व चाचपणी करण्यासाठी आता पतंजलीला नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय केवळ उत्तराखंड सरकारच्याच प्रमाणपत्रावर हे औषध तयार झाल्याचं दिसतंय. उत्तराखंड सरकारनं नेमकी कुठली लायसन्स या औषधाला दिलीयत, त्याचीही कागदपत्रं आयुष मंत्रालयानं मागवली आहेत.
बाबा रामदेव यांनी कोरोना व्हायरसवर आयुर्वेदिक औषध बनवण्याचा दावा केला आहे. पतंजलीचे बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली होती. पत्रकार परिषदेत औषधाच्या चाचणीत सहभागी असलेले वैज्ञानिक, डॉक्टर, संशोधकही उपस्थित होते. कोरोनावरील या औषधाला कोरोनिल हे नाव देण्यात आलं होतं.
संपूर्ण सायंटिफिक डॉक्यूमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही कोरोनावरील एविडेंस बेस असलेलं पहिलं आयुर्वेदिक औषध आहे. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इंस्टीट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस (NIMS), जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे, अशी माहिती बाबा रामदेव यांनी दिली होती.