LIVE UPDATES | माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर निवड

Background
देश विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा...
1. राज्यात 33 कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या रुग्णांची संख्या 16 वर, गरज असेल तरच घराबाहेर पडा, विभागीय आयुक्तांचं पुणेकरांना आवाहन
2. राज्यभरातली चित्रपटगृहं, व्यायामशाळा, स्विमिंग पूल 31 मार्चपर्यंत बंद, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी, मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू
3. कोरोनाच्या भीतीनं शहराबाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली, मुंबईकडे येणाऱ्या गाड्या मात्र रिकाम्याच
4. कस्तुरबापाठोपाठ KEMमध्येही बुधवारनंतर चाचण्या, लवकरच 250 तपासणी करणारी यंत्रणा आणणार, सेव्हन हिल्समधल्या बेड्सचीही संख्या वाढवणार
5. प्रशासनाचा आदेश धुडकावून शिर्डीत साई परिक्रमा यात्रा, आयोजकांवर गुन्हा दाखल, मंत्री छगन भुजबळांचाही पुण्यात जाहीर कार्यक्रम, तर चंद्रकांत पाटलांकडूनही पदाधिकाऱ्यांची बैठक























