- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
एल्गार परिषदेच्या आरोपींना 28 फेब्रुवारीला NIAच्या विशेष न्यायालयात हजर करणार, पुणे पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र
एल्गार परिषदेच्या आरोपींना 28 फेब्रुवारीला NIAच्या विशेष न्यायालयात हजर करणार, पुणे पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
14 Feb 2020 09:30 PM
घाटकोपरच्या भटवाडी विभागात चारित्र्यच्या संशयावरून होत असलेल्या भांडणाचा रागातून झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात घरगुती गॅस सिलेंडरची टाकी डोक्यात घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. अंजना प्रदीप कदम असे या हत्येत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रदीप कदम असे हत्या केलेल्या पतीचे नाव आहे. गेले काही दिवस प्रदीप हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यवरून संशय घेत होता. बेरोजगार आणि नशेखोर असलेल्या प्रदीपची त्याच्या पत्नीशी वारंवार भांडणे होत होती. काल सकाळी सर्व कुटुंब झोपेत असताना प्रदीपने घरातील गॅस सिलेंडर ची टाकी डोक्यात घालून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वतः घाटकोपर पोलीस ठाण्यात हजर होऊन पोलीसांना हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन साठी राजवाडी रुग्णालयात पाठविला आणि प्रदीप ला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथे एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. रेकॉर्डिंग व व्हिडिओ चित्रीकरण करून महिलेवर 3 आरोपीकडून अत्याचार केला जात होता. त्यामुळे आत्महत्या केल्याचं महिलेने सुसाईड नोटमध्ये नमूद केलं होत. तशा पद्धतीची पोलीस तक्रार देखील करण्यात आली होती. ही बातमी एबीपी माझाने दाखवताच पोलीस प्रशासनाला जाग आली असून, आता आरोपीच्या शोधात पोलिसांनी एक पथक तैनात केलं आहे.
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या अडचणीत वांढ होताना दिसतेय. जिल्हा आरोग्य विभागाने काल इंदुरीकरांना नोटीस बजावल्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून इंदुरीकर यांच्या वादग्रस्त व्हिडीओ संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय. वक्तव्य चुकीचे असुन गर्भधारणेबद्दल वक्तव्य करणे योग्य नाही. इंदुरीकरांचे वक्तव्य निषेधार्ह असून समर्थनासाठी धार्मिक ग्रंथाचा आधार घेणं चुकीच असल्याच अंनिसच्या कार्याध्यक्षा रंजना गवांदे यांनी सांगितलय.
पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची मुंबईत मुख्याध्यापक सक्षमीकरण कार्यशाळा.
अहमदनगर : गावठी कट्यासह 34 जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी शिरूरमधील तीन जणांना शुक्रवारी पहाटेच्या ताब्यात घेतल्यान एकच खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारामध्ये पाठलाग करून पुणे नाशिक महामार्गावर हिवरगाव शिवारातील टोलनाक्या जवळआरोपींच्या मुसक्या आवळल्या याप्रकरणी दयानंद तेलंग, दिपक खाडे, बाबासाहेब मुंजाल या तिघा विरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केलीय. मागील आठवड्यात संगमनेर शहरानजीक असणाऱ्या घुलेवाडी येथे सराफ व्यावसायिकावर गोळीबार झाला होता. त्यानंतरच पुन्हा एकदा हा गावठी कट्टा आणि 34 जिवंत काडतुसे गावठी कट्टा कुठून आला कोणाकडून विकत घेतला व कशासाठी त्याचा उपयोग करण्यात आलाय का याची चौकशी पोलीस करत आहे.
शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा
मनसेच्या केवळ झेंड्यात बदल झाला आहे, भूमिका कोणतीही बदलली नाही, हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांंनी कधी भूमिका घेतली का? : राज ठाकरे
LIVE | राज ठाकरे
🔷हिंदू जननायक म्हणून नका
🔷शरद पवारांशी वैयक्तिक संबंध चांगले
शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला, मात्र निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून 4 आठवड्यांचा दिलासा
सीएएच्या विरोधातील आंदोलने तीव्र होत आहेत, त्यात मुस्लीम समाज असल्याचं उभं केलं जातंय. मात्र, यात तथ्य नाही. या आंदोलनामध्ये सर्व जाती-धर्माची लोकं पाहायला मिळत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कोल्हापुरात माहिती.
मुंबई-गोवा महामार्गावर कारला अपघात, पेणजवळ कार पुलावरून खाली कोसळली, तीन जण जखमी तर दोघांची प्रकृती गंभीर
शाळांना पाच दिवसांचा आठवडा सुरु करणेबाबत आमदार कपिल पाटील यांचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र
पार्श्वभूमी
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. भाजप नेत्यांची गोली मारो विधानं महागात पडली, दिल्ली पराभवावर गृहमंत्री अमित शाह यांची कबुली, भविष्यात अशी वक्तव्य न करण्याचंही स्पष्टीकरण
2. शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनाप्रकरणी मध्य प्रदेश काँग्रेस सरकारनं माफी मागावी, देवेंद्र फडणवीस आक्रमक तर काँग्रेसच्या शिदोरी मासिकावर बंदीची मागणी
3. पाच दिवसांच्या आठवड्यावरुन सरकारचे मंत्री आमनेसामने, बच्चू कडूंचा घरचा आहेर, तर निर्णयामुळे सरकारचा एक दिवसाचा खर्च वाचल्याचा गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
4. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा, मनसैनिकांची बाईक रॅली, संभाजीनगरचेही बॅनर झळकले, बॅनरवर राज यांचा हिंदूत्व नायक असा उल्लेख
5. ठाण्यात पॅनकार्ड, आधारकार्ड आणि बांगलादेशी पासपोर्टसह राहणाऱ्या नागरिकांना मनसेनं पकडलं, पातळीपाडातील किंग काँग नगरमध्ये घरंही सापडल्याचं समोर
6. चीन सराकरनं 50 हजार कोरोनाग्रस्तांना जाळल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल तर जपानच्या जहाजावरील भारतीयांचे जीव वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं