IPO Update : क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ तब्बल 185 पट सबस्क्राइब, गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली,GMP कितीवर?
क्वाड्रंट फ्यूचर टेकनं 290 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला होता. कंपनीनं आयपीद्वारे 1 कोटी शेअर नव्यानं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्वाड्रंट फ्यूचर टेकच्या आयपीसाठी बोली लावण्यास 7 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. 9 जानेवारीपर्यंत बोली लावण्याची मुदत होती. या मुदतीत हा आयपीओ तब्बल 185 पट सबस्क्राइब झाला आहे.
या आयपीओला गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद दिला. मान्यताप्राप्त संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 132.54 पट सबस्क्राइब करण्यात आलं आहे.
गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ तब्बल 254.06 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे. तर, रिटेल गुंतवणकूदारांकडून हा आयपीओ 241.68 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे.
क्वाड्रंट फ्यूचर टेकद्वारे 10 जानेवारीला शेअर अलॉट केले जातील. तर, रिफंड 13 जानेवारीला मिळेल. आयपीओचं लिस्टींग 14 जानेवारीला होणार आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)