LIVE UPDATES | तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बोट उलटून 15 जण बुडाले

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Mar 2020 09:13 PM
महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल येथील तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बोट उलटून 15 जण बुडाले. त्यात स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणारे लोकांनी 6 जणांचे प्राण वाचवले. 1 बालिकेच्या घटनास्थळी बूडून मृत्यू झाला. तर 8 जण बेपत्ता झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे.
वर्धा तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस वादळान मोठं नुकसान झालय. वायगाव परिसरात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसान हजेरी लावली. काही ठिकाणी बोराच्या आकाराची गारही झालीय. यामध्ये वायगाव, भिवापूर, आष्टा, मिरापूर आदी गावांत प्रचंड नुकसान झालंय. गहू जमिनीवर लोळला असून, चणा, भाजीपाला आदी पिकांचं मोठं नुकसान झालंय. वाऱ्यामुळ काही घरांवरील छत, पानटपऱ्याही उडल्यात, रस्त्यावर झाडं, विजेचे खांब, तारा तुटून पडल्यात. यामुळं काही गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. प्रशासनाच्या वतीनं नुकसानीची पाहणी सुरू करण्यात आलीय. दरम्यान, कारंजा तालुक्याच्या काही भागातही जोरदार पाऊस झाल्यान पिकांचं नुकसान झालंय.
उद्या ठाणे महानगरपालिकेत अर्थसंकल्प सादर केला जाणार. आयुक्तांनी स्वतःहून पद सोडल्याने अतिरिक्त आयुक्त अर्थसंकल्प मांडणार आहेत. यावर गोंधळ होऊ शकतो. ठाणे महानगरपालिकेवर तीन हजार कोटीचे कर्ज असल्याचा आरोप होत होता, उद्या त्याबद्दल खुलासा होईल. संजीव जयस्वाल यांनी पालिकेला कंगाल केले, असे आरोप होत आहेत. त्यात आयुक्तांच्या वादामुळे सर्वात शेवटी अर्थसंकल्प मांडणारी ठाणे महानगरपालिका असणार आहे.
होळीच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात दोन जणांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून मृत्यू झालाय. पहिल्या घटनेत गोंडपीपरी तालुक्यात मुरुमाच्या खड्ड्यात बुडून 11 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला. नांदगाव फुर्डी गावातील संस्कार मोगरे रंग खेळल्यावर आंघोळीसाठी आपल्या मित्रांसह गावाशेजारील खड्ड्यावर गेला होता. मात्र, खड्डा खोल असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत वरोरा शहरातील युवक वर्धा नदीत बुडाला. अंकित पिंपळशेंडे हा सरदार पटेल वॉर्डातील युवक 4-5 मित्रांसह मारडा येथे वर्धा नदीवर रंगपंचमी साजरी करण्यासाठी व आंघोळी साठी गेला होता. दरम्यान आंघोळी करिता नदी पात्रात सर्व उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने अंकित बुडाला. नातेवाईक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंकितचा शोध सुरू आहे. होळीच्या दिवशी जिल्ह्यात दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने या सणाला गाटबोल लागले आहे.
पालघर : डहाणू जवळील अस्वाली धरणात एक तरुण बुडल्याची माहिती मिळाली आहे. स्वान आर्यन (वय 29)असं बुडालेल्या तरुणाचं नाव असून तो डहाणूतील मसोली येथील राहणारा आहे. आज धुळवड खेळून झाल्यानंतर आपल्या तिघा मित्रांसह धरणावर अंघोळीसाठी गेला असताना बुडल्याची पोलिसांची माहिती. पोलीस घटनास्थळी असून बचावकार्य सुरू.
भिवंडी शहरातील संगमित्रनगर परिसरात धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर परिसरातील मुलं धुलीवंदन खेळत असताना कपडे पाण्यावरून वाद सुरू झाला. पाहता पाहता हा वाद मुलांच्या दोन गटातील हाणामारी बदलला. मात्र, मुलांच्या होत असलेल्या या दोन गटांच्या भांडणाला सोडवण्यासाठी काही स्थानिक महिला गेल्या असता त्यांनादेखील त्या ठिकाणी मारहाण झालीये. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लाठीचार्ज करत भांडण करणाऱ्या टोळक्यांना पळवून लावलं आहे, सध्या शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
वसई : वसईत अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. वसईच्या वसंत नगरी येथे इनोवा गाडीचा अपघात झाला आहे. वाहन चालकाने दारू पिऊन गाडी चालवल्यामुले हा अपघात झाला आहे. गाडी रस्त्याच्या कडेला डिवाडरवर चढून एका झाडाला ठोकली. गाडीत दोन जण होते. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. एमएच 48 एसी 9612 असं गाडीचा नंबर असून, पावने सहा वाजताची ही घटना आहे. सागर शाह असे वाहनचालकाचे नाव आहे.
पुण्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे. नायडू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली असल्याचं उघड झालं आहे. तसेच दुबईहून परतल्यानंतर दाम्पत्याला मुंबईहून पुण्याला घेऊन येणाऱ्या टॅक्सीच्या ड्रायव्हरची टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 4 वर पोहोचली आहे.
आज धुलिवंदन आहे सर्वत्र रंग खेळण्यात येत आहे. या रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून मुंबई पोलीस सतर्क आहेत. आज युवा वर्ग रंग खेळत असतानाच नशा पाणी करून रंग खेळतात तसेच वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून बेफाम होतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीने ठिक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. वाहतूक पोलीस आणि शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने नाकाबंदी करण्यात येत आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रमाबाई नगर समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे कर्मच्यारी मोटारसायकल स्वार तसेच कार चालकांना थांबवून ब्रिथ अनालायझर या मशीनच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी करीत आहेत तसेच विना हेल्मेट,परवाना नसलेल्या वाहणाचालकांवर कारवाही करण्यात येत आहे सकाळपासून 40 ते 50 जणांवर विविध कलमानव्याने कारवाही करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंडलिक कायगुडे यांनी दिली आहे.
नाशिक जिल्हा शासकिय रुग्णालयातील कोरोना विलिकरण कक्षात आज दोन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. एकाच घरातील हे रुग्ण असून मुलगी आणि आई अशा या दोघीचे रिपोर्ट सध्या पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दुबईहून भारतात आलेल्या मुलीला श्वसनाचा आणि सर्दीचा त्रास होत होता. अशीच लक्षण आईमध्ये देखील दिसून आली.
येवला तालुक्यातील गुजरथेडा येथिल दोन सख्ख्या बहिणांना लग्नाचे आमिष दाखवत अपहरण झाल्याची घटना आठ मार्चच्या रात्री घडली होती. ल सकाळी मुलींच्या वडिलांनी येवला तालुका पोलीसात याची तक्रार दाखल केली. ळवून नेणाऱ्या व्यक्तीने मुलींच्या वडिलांना फोन करुन पन्नास हजाराच्या खंडणीची मागणीही केली होती. पोलीसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत कोपरगाव, शिर्डी परिसरात दोन पथके पाठविली होती. त्यातील एका पथकाने दोन्ही मुलींना पळवून नेणाऱ्या राहूल पवार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याने दोन्ही बहिणींना कोपरगाव तालूक्यातील पोहेगाव येथे एका तृतीयपंथीकडे ठेवल्याचं सांगितल्याने पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास दोन्ही मुलींची सुखरुप सोडवणूक केली. या प्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतल असून त्यांच्या अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केलाय.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती 31 टक्क्यांनी खाली घसरल्या आहेत. सौदी अरेबियाने पेट्रोलच्या किंमतीत केलेली कपात यासाठी कारणीभूत ठरलेली आहे. रशियाने उत्पादन कमी करण्याचे मान्य केले नाही; त्यामुळे सौदीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. या दोन्ही देशाच्या भांडणाचा फायदा भारताला होऊ शकतो, असे मत रत्नागिरी फामफेडाचे अध्यक्ष उधय लोध यानी मत व्यक्त केले. यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी.
यवतमाळ : शहरातील आझाद मैदान चौकात असलेल्या इंद्रप्रस्थ प्लाझा या दुकानाच्या प्लाझाच्या बेसमेंटमध्ये आज शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत 3 दुकाने जळून खाक झाली आहेत. यात लाखोंचा मुद्देमाल जळला आहे. तीन दुकानांपैकी दोन दुकानामध्ये माल साठवूण त्याला गोडावूनप्रमाणे साहित्य ठेवले होते. त्यालाही आग लागली, ही आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे दोन बंब बोलवविण्यात आले होते. 1 तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
औरंगाबाद : नाथषष्टीचा उत्सव रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, नाथषष्ठी उत्सवात दरवर्षी लाखो भाविक होतात सहभागी, पैठणमध्ये 15 दिवस सुरू राहणाऱ्या श्री नाथषष्ठीला सुमारे सात ते आठ लाख भाविक दर्शनासाठी येतात

भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, केरळमध्ये आणखी सहा जणांना कोरोनाची लागण, कर्नाटकमध्येही कोरोनाचे चार रुग्ण, सरकारसमोर मोठं आव्हान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील इगतपुरी विपश्यना केंद्रातील उद्यापासूनचे सर्व शिबिरं रद्द होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान विदेशी नागरिकांना डिसेंबर 2020 पर्यंत इगतपुरी केंद्रात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. उद्यापासून इगतपुरी केंद्रात शिबीर सुरु होणार होतं. यासाठी जवळपास 600 साधक येणार होते.
कोल्हापूर महापौर केसरी कुस्ती स्पर्धा रद्द, कोरोनाच्या कारणामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय, महापालिका आयुक्तांचा निर्णय
सोलापूर : खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून राम मोरे या युवकाचं विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न, कर्जाची परतफेड करुनही वारंवार पैशासाठी तगादा लावल्याचा आणि पोलिसांनीही तक्रारीची दाखल न घेतल्याचा आरोप, उत्तर सोलापूर तालुक्यातील नरोटेवाडी गावची घटना
कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार सुरु, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तपास सुरु, नागरिकांनी स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, कोरोनासंदर्भातील पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्तांचं आवाहन
नशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु, जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सर्व शासकीय कार्यलयाना सूचना, कोरोना विषाणूची आपत्ती ओढावू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क
'एबीपी माझा'चा चॅनल लोगो वापरुन कोरोना रुग्णांसंदर्भात खोटी माहिती व्हॉट्सअॅपवर व्हायरल, खोट्या अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र गलांडे यांच्या तक्रारीवरुन उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, एबीपी माझाचा लोगो वापरून समुद्रवाणी, उस्मानाबाद रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली होती, यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक गलांडे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्य प्रदेश काँग्रेसला मोठा धक्का, ज्योतिरादित्य शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणूतील धानीवरी जवळील ओसरविरा फाटा येथे अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक, धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू, वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल, मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या महामार्ग ओलांडत असताना अपघात घडल्याचा अंदाज
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इराणमधे अडकलेल्या भारतीयांना सोडवण्यासाठी भारतीय वायुदलाचं सी-17 ग्लोबमास्टर विमान काल रात्री रवाना, 58 लोकांच्या पहिल्या बॅचला घेऊन हे विमान थोड्याच वेळात भारतात दाखल होणार, विदेशमंत्री एस.जयशंकर यांची ट्वीटद्वारे माहिती
अमरावतीतील तिवसा, मोर्शी आणि चांदूरबाजार तालुक्यात पहाटे 4 वाजता अवकाळी पावसाची हजेरी, तिवसा तालुक्यातील अनेक ठिकाणी गारपीट, शेतीचं मोठं नुकसान..
पुण्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ, पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना

पार्श्वभूमी

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा  www.abpmajha.in



राज्यातील आणि देशभरातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

1. राज्यात कोरोनाची लागण झाल्याची पहिली केस समोर, पुण्यात दोघांना कोरोना झाल्याची पुष्टी, एबीपी माझाला आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

2. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मध्य प्रदेशच्या 22 मंत्र्यांचे घेतले राजीनामे, भाजपचं ऑपरेशन कमळ हाणून पाडण्यासाठी काँग्रेसची रणनिती, सहा मंत्री बंगुळरूत

3. कोरोनामुळे पोल्ट्री उद्योगाचं 900 कोटींचं नुकसान, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे साडे सहा लाख कोटी बुडाले, औरंगाबादची निवडणूक पुढे ढकलण्याची एमआयएमची मागणी

4. येस बँकेचे कर्ज बुडवणारे भाजपचे देणगीदार, आपचा गंभीर आरोप तर राणा कपूरांच्या तिन्ही मुलींची कार्यालयं सीबीआयकडून सील

5. राज्यसभेचा चौथा उमेदवार महाविकास आघाडी ठरवेल, काँग्रेसकडून राष्ट्रवादीवर कुरघोडीचा प्रयत्न, तर उमेदवार निश्चितीसाठी आज भाजपची बैठक

6. ठाकरे सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेकडून शॅडो कॅबिनेट जाहीर, नवी मुंबईतल्या मेळाव्यात राज ठाकरेंची घोषणा, आदित्य ठाकरेंच्या खात्यांवर अमित ठाकरेंची नजर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.