एक्स्प्लोर

भाजपच्या 12 निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतलं जाणार का? आज दुपारी विधानभवनात सुनावणी

आज दुपारी भाजपच्या 12 निलंबित आमदारांची सुनावणी विधानसभा उपाध्यक्ष यांच्या दालनात होणार आहे. यामध्ये भाजपच्या निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई : भाजपच्या 12 निलंबित आमदारप्रकरणी आज विधानभवनात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यापुढे सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे. यामध्ये भाजपच्या निलंबित आमदारांचे निलंबन मागे घेतले जातं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज दुपारी होणाऱ्या या सुनावणीला भाजपचे नेते अतुल भातखळकर उपस्थित राहणार नाहीत. कारण कोरोनामुळे उपस्थित राहू शकत नाही असं त्यांनी पत्राद्वारे कळवले आहे. याशिवाय आमदार गिरीश महाजन, आमदार राम सातपुते हे देखील उपस्थित राहू शकणार नाहीत.

आज दुपारी भाजपच्या 12 निलंबित आमदारांची सुनावणी विधानसभा उपाध्यक्ष यांच्या दालनात होणार आहे. उद्या याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी देखील होणार आहे.  त्याआधी निलंबन मागे घेतलं जातं का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वोच्य न्यायालयाने 14  डिसेंबर 2021 ला विधीमंडळास नोटीस जारी केली होती. निलंबित आमदारांबाबत अर्ज करूनही अधिवेशन (22 ते 28 डिसेंबर) कालावधीत काहीच निर्णय घेतला गेला नाही. आता उपाध्यक्षांना अध्यक्षपदाचा प्रभारी चार्ज आहे. त्यामुळे त्यांना थेट निर्णय घेण्याचा अधिकार नाही, यामुळे आता लेखी उत्तर तुर्तास विधीमंडळ सचिव यांना कळवत असल्याचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, आज होणाऱ्या या सुनावणीला भाजप आमदार आशिष शेलार, अभिमन्यू पवार, जयकुमार रावल हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिवेशनादरम्यान भाजपच्या काही सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला होता. तालिका अध्यक्षासमोरचा माइक व राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला होता. सभागृह तहकूब झाल्यानंतरही सदस्य शांत झाले नव्हते. त्यांनी अध्यक्षांच्या दालनातही गोंधळ घातला होता. त्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले होते. भाजप सदस्यांच्या या गैरवर्तनाची गंभीर दखल घेत सत्ताधारी पक्षानं निलंबनाचा ठराव आणला होता. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी हा ठराव मांडला होता. हा ठराव आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. त्यानुसार, भाजपच्या 12 सदस्यांना एक वर्षासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं. निलंबीत केलेल्या आमदारांमध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरीश पिंपळी, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तिकुमार (बंठी) भांगडिया यांचा समावेश आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget