जळगाव : रशिया (Russia) देशातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेले जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील तीन विद्यार्थी वोल्खोव्ह नदीच्या (Volkhov River) किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. त्यावेळी लाट येऊन त्यांचा त्यात बुडून मृत्यू (Drown) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तिघांसोबत असलेल्या विद्यार्थ्यास वाचवण्यात यश आले आहे.  


याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी रशिया येथील दुतावासातील  कुमार गौरव (आय.एफ.एस) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला आहे.


जळगावातील तिघांचा मृत्यू, एकाला वाचवण्यात यश


याबाबत प्राथमिक माहितीनुसार, हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्रकिनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. यावेळी एक मोठी लाट आली आणि त्यांना नदीत ओढले. यात तिघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. 


पालकांना सहकार्य करण्याची विनंती


सध्या रशियन फेडरेशनमधील संबंधित एजन्सी पुढील कार्यवाही करत आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला. भारतीय दुतावासाने संबंधित विद्यापीठाशी संपर्क करून माहिती जाणून घेतल्याचे सांगितले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. पालकांना पूर्ण ते सहकार्य करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाने भारतीय दुतावासच्या अधिकाऱ्यांना केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Nagpur News : तलावात पोहण्याचा मोह बेतला तिघांच्या जीवावर; तर वर्ध्यात पहिल्याच दिवशी जलतरण तलावात बुडून बालकाचा दुर्दैवी अंत


Nashik News : शेततळ्यात बुडून दोन भावंडांचा दुर्दैवी अंत, नाशिकमध्ये दहा दिवसातील चौथी घटना