Monsoon News : देशात मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. हळूहळू मान्सून देशातील सर्व भागात दाखल होत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील काल (6 जून) मान्सून दाखल झाला आहे. मात्र, मान्सून आला म्हणजे नेमकं काय झालं? मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस सुरू होतो का? याबाबतची सविस्तर माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे.

  


बाष्पयुक्त वारे नैऋत्येकडू ईशान्यकडे वाहते


मान्सूनच्या मूळ उगमापासून वि्षुववृत्तावर (दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील पेरू, कोलंबिया, ईक्वेडोर देशापासून) समुद्रावरून अंदाजे 19000 हजार किलोमीटर अंतर कापून वाहत येणारे वारे तुमच्या गावापर्यंत बाष्प घेऊन येते. या वाऱ्याचा प्रचंड प्रवाह वातावरणीय प्रणालीद्वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्त समांतर वाहत येतो. यावेळी त्या वाऱ्यांचा रस्ता मोकळा झाला आहे असेच समजावे. यावेळी आपल्याकडे 4 महिने बाष्पयुक्त वारे नैऋत्यकडू ईशान्यकडे वाहते. या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल, किंवा दमदार पणा असेल, तरच पाऊस होतो अन्यथा नाही अशी माहिती माणिकराव खुळे यांनी दिली.


मान्सून वारे तुमच्या गांवापर्यंत पोहोचणे गरजेचे


ऊर्जा कमी झाली तर फक्त मान्सूनचे बाष्पयुक्त वारेच ही ऊर्जा पुन्हा भरु शकतात. म्हणून त्यासाठी मान्सून वारे तुमच्या गांवापर्यंत पोहोचणे गरजेचे असते. म्हणून तर कधी असे होते की मान्सून आला, किंवा येऊन पुढे गेला तरी पाऊस होत नाही. मग शेतकरी गोंधळतात. त्यांना वाटतं हा काय प्रकार आहे? मान्सून आला म्हणतात, पण पाऊस न पडता चक्क ऊन का पडते? तर याचे उत्तर या ऊर्जेत असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरम्यान, यावर्षी 'ला-निना' आहे. त्यामुळं बाष्प-ऊर्जास्रोताची उपलब्धता भरपूर असणार आहे. त्यामुळं मान्सून प्रवाहादरम्यान ऊर्जा कमी झाली तर निसर्ग आपोआप भरण्याची व्यवस्था करतो असे माणिकराव खुळे म्हणाले.



महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती