एक्स्प्लोर

कुत्र्याला वाचवताना तीन भावांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू, सांगलीतील दु:खद घटना

वैभव व्हनमाने, विजय व्हनमाने आणि आनंदा व्हनमाने अशी बुडालेल्या तीन भावाची नावे आहेत.

सांगली : आपल्या आवडत्या कुत्र्या वाचवताना तीन भावांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला आहे. पट्टीच्या पोहणाऱ्या या तीनही भावांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दोन सख्खे आणि एका चुलत भावाचा यामध्ये समावेश आहे. आटपाडी तालुक्यात घाणंद येथे ही दु:खद घटना घडली आहे. 

वैभव व्हनमाने, विजय व्हनमाने आणि आनंदा व्हनमाने अशी बुडालेल्या तीन भावांची नावे आहेत. साखळी बंधाऱ्यात बुडालेल्या या तीन मुलांसाठीचे शोधकार्य संपले असून तिन्ही मुलांचे मृतदेह बंधाऱ्यातच सापडले आहेत. यातील दोन भावांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत पाण्यात आढळल्याचे पाहून या नातेवाईक आणि नागरिकांना आपले अश्रू अनावर झाले.  सांगलीतील विश्वकर्मा फाउंडेशन बोट क्लबचा सदस्य गजानन नरळे आणि त्याच्या टीमने पुढाकार घेत या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.

टेंभू योजनेचे पाणी घाणंद तलावात आले आहे. तलाव भरून सांडव्यावरून पाणी वाहत होते. सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी कालव्यातून आटपाडीकडे येते. तेथे लगतच अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने यांची शेत जमीन आहे. लगतच कालव्यातून पाणी वाहत जाते. नेहमीप्रमाणे काल दुपारी तीन वाजता घरातील कुत्र्याला सोबत घेऊन मासेमारीसाठी विजय अंकुश व्हनमाने, आनंदा अंकुश  व्हनमाने आणि वैभव लहू व्हनमाने गेले होते. सायंकाळी सहा पर्यंत ते घरी परतले नाहीत. 

त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. रात्री आठ वाजता घाणंद तलावातून बाहेर पडलेल्या पाण्याच्या कालव्या जवळ विजय आणि आनंदा यांचे कापडे आणि चपला सापडल्या. त्यांच्या सोबत नेलेल्या कुत्र्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात आढळला. तर वैभव याची काहीच माहिती लागली नाही. गावकऱ्यांनी आटपाडी पोलीस आणि महसूल प्रशासनाला माहिती दिली. रात्री साडेआठ वाजता घटनास्थळी तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस आणि ग्रामस्थांनी पाण्यात बराच वेळ शोधाशोध केली, मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलांचा तपास लागला नाही. आज सकाळपासून  पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.  विश्वकर्मा फाऊंडेशन बोट क्लबचा सदस्य गजानन नरळे यांने पुढाकार घेत या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले.

 

महत्त्वाच्या बातम्या

वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र आक्रमक, महिलांसह लहान मुलांचं समुद्रात उतरुन जलसमाधी आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? 
वाढवण बंदराविरोधात भूमिपुत्र आक्रमक, महिलांसह लहान मुलांचं समुद्रात उतरुन जलसमाधी आंदोलन, प्रशासनाची भूमिका काय? 
पवारसाहेबांची तब्येत व्यवस्थित, काळजी करण्याचं कारण नाही, रोहित पवार रुग्णालयात दाखल, डॉक्टरांशीही केली चर्चा 
पवारसाहेबांची तब्येत व्यवस्थित, काळजी करण्याचं कारण नाही, रोहित पवार रुग्णालयात दाखल, डॉक्टरांशीही केली चर्चा 
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget