एक्स्प्लोर

ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुखांना 6 महिन्यांपासून खंडणीसाठी धमक्या

सोलापूर : विधिमंडळात 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सांगोल्याचे प्रतिनिधित्त्व करणारे जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना गेल्या सहा महिन्यांपासून 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावलं जात आहे. या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ आज सांगोला शहर आणि तालुक्यात कडकडीत बंद पाळून हजारो नागरिकांनी भव्य मूक निषेध मोर्चा काढला. एबीपी माझा वृत्तवाहिनीने या धमकीपत्रांबाबतीत पहिल्यांदा आवाज उठवल्यावर संपूर्ण सांगोला परिसरात संतापाची लाट उसळली. खुद्द मुख्यमंत्र्यांकडे गृह विभाग असताना एक माथेफिरु 10 कोटी रुपये खंडणीसाठी 4 एप्रिलपासून सतत निनावी पत्राद्वारे कुटुंबाला जिवंत मारण्याची धमकी देत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधित्त्व करणारे गणपतराव देशमुख हे 1948 पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहेत. आजवर 12 वेळा निवडणुकीत विजयी झालेले देशमुख हे आज 90 वर्षांचे असून प्रत्येक निवडणूक या जनतेच्या लोकवर्गणीतून विजयी होणाऱ्या गणपतरावांना थेट 10 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचे कृत्य हास्यास्पद असल्यानेच देशमुख यांनी स्वतः हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता. धमकी देणारा माथेफिरु मराठी आणि हिंदी भाषेत पत्रं पाठवत असून पंढरपूर-यशवंतपूर या रेल्वेच्या शेवटच्या डब्यात 10 कोटी रुपये ठेवण्याबाबत मागणी करत आहे. याबाबत पोलिसांनी त्या ठिकाणी बॅग ठेवून त्याचा माग घेण्याचा प्रयत्न करुनही तो न आल्याने पोलिसांना हात चोळत बसावे लागले होते. यानंतर एबीपी माझाने हे धमकी प्रकरण बाहेर काढल्यावर काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. "मी आजवर कोणाला आणि कधीच दुखावले नसून मला याबाबत काहीच बोलायचे नाही. मी मरणाला घाबरत नाही." अशी प्रतिक्रिया देत देशमुख यांनी कॅमेरा समोर येण्यास नकार दिला. माथेफिरुने धनगर समाजाच्या आरेवाडी येथील मेळावा आणि इतर ठिकाणी देखील देशमुख यांचा माग काढल्याचे धमकीपत्रात उल्लेख केलंय. त्यामुळे या सर्व प्रकारचे गांभीर्य आणखी वाढले आहे. आता गणपतराव देशमुख यांच्या सुरक्षेकडे मुख्यमंत्री कशाप्रकारे लक्ष देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget