एक्स्प्लोर

शेतकऱ्यांकडून सक्तीची वीजबिल वसूली नाही

उन्हाळयात महाराष्ट्रात कुठेही भारनियमन केले जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे. यासाठी 20 लाख टन परदेशी कोळसा आयात करण्यात येणार आहे.

मुंबई : शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसूली केली जाणार नाही किंवा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली. तसेच मुंबईत अदाणी इलेक्ट्रीसिटी या कंपनीकडून ग्राहकांच्या वीज बिलात नियमबाह्य पैसे आकारले गेले असतील तर ते पैसेही ग्राहकांना परत देण्यात येतील असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. आ. प्रकाश गजभिये यांनी राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करणार का? तसेच वीज कनेक्शन तोडण्यासं‍बंधित प्रश्नावर उत्तर देताना ऊर्जा मंत्री म्हणाले की, राज्यात 45 लाख शेतकऱ्यांवर 35 हजार कोटींची थकबाकी आहे. महावितरण जी वीज 6 रूपयाने घेते ती वीज शेतकऱ्यांना 1 रूपये 80 पैशांनी दिली जाते. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची सक्तीची वीज बिल वसूली करू नये तसेच वीज कनेक्शनही तोडले जाऊ नये असा निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती पाहून कोण्यात्याही शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसूली केली जाणार नाही असेही ऊर्जामंत्र्यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. ऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, उन्हाळयात महाराष्ट्रात कुठेही भारनियमन केले जाणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे. यासाठी 20 लाख टन परदेशी कोळसा आयात करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त डब्ल्युसीएल, एमसीएल, एसईसीएल या कंपन्यांकडून अतिरिक्त कोळसा पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. कोयनेचे पाणी ही जपून ठेवण्यात आले आहे. उन्हाळयात कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवला जाईल. आ. अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ऊर्जामंत्री बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Tukaram Munde FDA News: सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू, 2 ते 3 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Embed widget