मुंबई : कोरोनाच्या दुस-या लाटेतून धडा घेतल्यानंतर आता कोरोनाच्या तिस-या लाटेसाठी कंबर कसणं गरजेचं आहे. तिस-या लाटेत लहानग्यांना कोविड संक्रमणाचा धोका आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या चाईल्ड टास्क फोर्सनं गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यात लहान मुलांचं इतर आजारांपासून संरक्षण करणा-या लसींवरही भर देण्यात आला आहे. तिस-या लाटेत लहानग्यांना कोरोनाचा धोका? 

Continues below advertisement

राजस्थानमध्ये लहान मुलांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना बघायला मिळत आहे. त्यामुळे देश आता कोरोनाच्या तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. राजस्थानमध्ये 18 वर्षांखालील एकूण 1181 मुले संक्रमित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रानंही आता लहानग्यांना कोरोनापासून वाचवण्याची तयारी सुरु केली आहे.

लहान मुलांना कोविड पासून वाचवण्साठी त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्या दरम्यान कोविड साथीत फ्लूच्या साथीची भर  पडू नये यासाठी 6 महिने ते 5 वर्षांपर्यंत  इन्फ्लुएन्झा लसीचे डोस  देण्याच्या सूचना चाईल्ड टास्क फोर्स संकल्पना आहेत. सोबतच, लहान मुलांचं इतर आजारांपासून संरक्षण करणा-या लसीकरणाचं वेळापत्रकही कटाक्षानं पाळलं जाण्यासाठी राज्य सरकारनं तयारी करावी अशा सूचना आहेत. त्यामुळे घरातील  लहान मुले कोरोनाबाधित झाली तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Continues below advertisement

खालील गोष्टींकडे लक्ष द्या

  •  वरचेवर कणकण, ताप आहे का? 
  • खोकला थांबत नाही का? 
  • मुलं अचानक शांत झालंय का? 
  • लघवी करण्यात काही अडचण येतेय का? 
  • मुलं खेळता खेळता दमतंय का? 
  • अंगावर रॅशेस येणं

ऑक्सिजन लेव्हल कमी जास्त होणं अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं आणि लक्षणांनुसार कोविड संक्रमित मुलांना घरी किंवा रुग्णालयात दाखल करुन उपचार करता येतील. 

चाईल्ड टास्क फोर्स कडून लहान मुलांमधील कोरोना धोक्याबाबत गाईडलाईन्स जारी

  • माईल्ड, मॉडरेट, सिवीअर अशा तीन गटांमध्ये 18 वर्षांखालील कोविड रुग्णांचं वर्गीकरण
  • असिम्पटमेटीक आणि माईल्ड सिम्प्टम्स असलेल्या मुलांना घरीच बरे करता येऊ शकेल.
  • मॉडरेट आणि सिव्हीअर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयात दाखल करावे.
  • कोविड बाधित लहान मुलांवर उपचार करण्यासाठीविशेष डॉक्टरांची टीम तयार करुन त्यांचे प्रशिक्षण करण्यात येतंय.
  • घरी असलेल्या कोरोनाबाधित लहान मुलांचे तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल वेळोवेळी तपासावी.
  • स्थानिक पातळीवर कोविड सेंटरमध्ये चाईल्ड बेड तयार करावे.
  • मात्र या संपूर्ण काळात लहान मुलांच्या मानसिकतेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

मान्सूनपूर्वी सर्व मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्यावी; कोविड आणि पीडियाट्रिक टास्कफोर्सचा महाराष्ट्र सरकारला सल्ला