एक्स्प्लोर

देवगड मधील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावरील तिहेरी तटबंदीपैकी दुसरी चिलखती तटबंदी कोसळली

समुद्रात बुरुजाची पडझड होत आहे. हा बुरुज समुद्राच्या पाण्यात असल्याने या बुरुजाची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी किल्लेप्रेमी कडून केली जात आहे.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावरील तिहेरी तटबंदीपैकी दुसरी चिलखती तटबंदी कोसळली. साधारणपणे 30 ते 40 फूट भागातील ही तटबंदी कोसळली. समुद्राकडील पूर्वेच्या बाजूने असलेली दुसरी चिलखती तटबंदी सतत पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओली होऊन मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. सकाळी किल्ल्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनास सदर बाब आली. त्यांनी तातडीने पुरातत्व विभागास सदर गोष्टीची कल्पना दिली. पुरातत्व विभागाकडून पुढील उपाययोजना करणार येणार आहेत. तर दुसरीकडे समुद्रात बुरुजाची पडझड होत आहे. हा बुरुज समुद्राच्या पाण्यात असल्याने या बुरुजाची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी किल्लेप्रेमी कडून केली जात आहे.

विजयदुर्ग किल्ल्याविषयी माहिती

विजयदुर्ग किल्ला हा अभेद्य जलदुर्ग असून तो देवगड मधील वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन 1193 ते 1206 या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर 61 किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली. त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे. सन 1200 मध्ये तो बांधला गेला असावा असा अंदाज आहे.

इ.स. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. 1218 मध्ये बुडविले. इ.स. 1354 मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स. 1431 मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. 1490 ते 1526 या काळात बहामनी राज्याचे 5 तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर 1653 पर्यंत सुमारे 129 वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 साली हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला.

छत्रपती शिवाजी महरांजानी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा साधारण 5 एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. 14 एकर 5 गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली.

किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्‍या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर 30 मिटर उंचीची तटबंदी. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत. डाव्या बाजूला खलबतखाना नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये सभा बैठका होत. या इमारतीचच्या समोर दारु-गोळ्याचे कोठार आहे.

पुढे गेल्यावर भुयार दिसते. भुयाराच्या बाजूने तटावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या किल्ल्यास विविध नावाचे 18 बुरूज आहेत. तटावरुन चालतांना बारकाईने पाहिल्यास तटाखालील कोठारे दिसून येतात. कांही अंतर चालून गेल्यावर लाईट हाऊस दिसते. लाईट हाऊसच्या पुढे तटाच्याखाली चुन्याचा घाणा दिसतो. तटाते बांधकाम करतांना दगडामध्ये सांधण्यासाठी वापरावयाचे सिमेंट मिश्रण म्हणून चुना, रेती, गुळ, हरड्याचे पाणी व नारळाचा काथा या घाण्यामध्ये मिश्रण करुन सिमेंट बनवत. चुन्याचा घाण्याच्या बाजूला गोड्या पाण्याच्या विहिरी, साहेबाचे ओटे, भवानी मातेचे मंदिर, जखीणीची तोफ यासारख्या गोष्टी येथे पहावयास मिळतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget