भीकेच्या धंद्याचं वास्तव; औरंगाबादमध्ये दीड लाखांत 2 चिमुकल्यांची खरेदी करुन भीक मागायला बसवलं
औरंगाबादेत एका भीक मागणाऱ्या महिलेने चक्क भीक मागण्यासाठी दोन मुलं दीड लाखात खरेदी केली आणि त्यांना भीक मागायला लावलं. एवढच नाही तर मुलांनी हे काम केले नाही तर ही महिला त्यांनी मारहाण देखील करत असे.
मुंबई : औरंगाबाद शहरात भीक मागणाऱ्या एका महिलेनी दीड लाखात दोन चिमुकली मुले विकत घेऊन त्यांना भीक मागायला लावल्याची प्रकार समोर आला आहे. पोटच्या आईकडूनच 100 रुपयांच्या बाँडवर व्यवहार केला गेला .यातील एक पाच वर्षांचा, तर दुसरा दोन वर्षांचा मुलगा आहे. या प्रकरणी शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. ज्याची आज पर्यंत आपण कल्पनाही केलेली नसेल असा हा व्यवहार जन्मदात्या आईने केला आहे.
प्रत्येक मोठ्या शहरात चौकाचौकात, सिग्नलाल लहान मुलांनी भीक मागणे हे दृश्य नित्याचं झाले आहे. सिग्नलवरील या चिमुकल्यांचे हाल पाहून आपलं हृदय पिळवटून जाते आणि आपण जवळ असलेले काही पैसे त्यांना देतो. मात्र या लहान लहान मुलांचे निरागस चेहरे वापरून यामागे काही लोक गोरख धंदा करत असल्याचं औरंगाबाद मध्ये समोर आलाय. औरंगाबादेत एका भीक मागणाऱ्या महिलेने चक्क भीक मागण्यासाठी दोन मुलं दीड लाखात खरेदी केली आणि त्यांना भीक मागायला लावलं. एवढच नाही तर मुलांनी हे काम केले नाही तर ही महिला त्यांनी जबर मारहाण देखील करत असे.
रामनगर येथे जनाबाई उत्तम जाधव ही महिला मुलांनी भीक मागितली नाही तर या लहान मुलांना अमानुषपणे मारहाण करत असे. रात्री बाथरूमध्ये झोपायला लावत होती, तासनताल पाण्यात बसवून ठेवत असे. या लहान मुलांच्या होणाऱ्या छळाची माहिती मुकुंदवाडी रामनगर भागात राहणाऱ्या समाजसेवक देवराव विर यांच्या लक्षात आली. त्यांनी प्रकरणी थेट मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली आणि मुकुंदवाडी पोलिसांनी मुलं विकत घेणाऱ्या एका महिलेला आणि पोटचा गोळा विकणाऱ्या महिलेला अटक केली आहे.
ही मुले मी दत्तक घेतल्याचा दावा या प्रकरणातील महिला आरोपींनी केला. मात्र, मुकुंदवाडी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. कुटुंबीयांबाबत मुलांना विचारले असता आजी-आजोबा अकोल्याला, तर आई-वडील देऊळगावात राहत असल्याचे त्याने सांगितले. पुढील तपास करत आहेत .