एक्स्प्लोर

Sagareshwar Deer Sanctuary Sangli : राज्यातील एकमेव मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्य कात टाकणार

वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सागरेश्वर अभयारण्याच्या (Sagareshwar Deer Sanctuary Sangli) समस्या आणि विकासाचा आढावा घेत अभयारण्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

Sangli : महाराष्ट्रातील एकमेव असे मानव निर्मित अभयारण्य म्हणून सांगली जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याची (Sagareshwar Deer Sanctuary Sangli)  ओळख आहे. मात्र, हेच अभयारण्य अनेक दिवसांपासून समस्यांच्या गर्तेत सापडले होते. मात्र, आता वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सागरेश्वर अभयारण्याच्या समस्या आणि विकासाचा आढावा घेत अभयारण्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. 

पलुस आणि कडेगाव वन विभागाच्या क्षेत्रातील समस्यासंदर्भात नुकतीच मुंबईत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत सागरेश्वर अभयारण्याच्या (Sagareshwar Deer Sanctuary Sangli) विकासाबाबत आणि अभयारण्याच्या भोवताली शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सागरेश्वर अभयारण्याला मजबूत संरक्षक भिंत नसल्याने प्राणी शेतीचे प्रचंड नुकसान करत होते. त्याचबरोबर यामध्ये प्राणी देखील दगावण्याच्या घटना घडल्या होत्या. 

अभयारण्य परिसरात अवैध वृक्षतोड देखील होत होती. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर देखील वन विभागाकडून कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी आमदार अरुण लाड यांच्याकडे याबाबतीत तक्रारी केल्या होत्या. यावर या बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास करणे, आग नियंत्रण ही अभयारण्यामधील कामे प्राधान्याने करून घेण्यात येणार आहेत.

या भागातील अवैध वृक्षतोड थांबवून सागरेश्वर अभयारण्यामध्ये (Sagareshwar Deer Sanctuary)  हरणांकरिता चारा उपलब्ध करावा. सागरेश्वर अभयारण्य विकसित करताना स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेवून वन विभागाने कामे करावीत अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. अभयारण्यातील वन विभागातंर्गत करता येतील अशी कामे स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून पूर्ण करण्यात यावीत. अभयारण्याच्या विकासाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जी कामे करता येणे शक्य आहेत, त्याचा तत्काळ प्रस्ताव बनवावा आणि ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.  या भागात अवैध वृक्षतोडी संदर्भातही वन विभागाने तत्काळ कारवाई करावी अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या. 

सागरेश्वर अभयारण्य उत्कृष्ट पध्दतीने विकसीत करावे जेणेकरून या अभयारण्यामध्ये पर्यटन देखील वाढण्यास मदत होईल त्यादृष्टीने प्रयत्न करावे अशा सूचना करण्यात आलेत. बैठकीनंतर या अभयारण्या संदर्भात दहा दिवसाच्या आत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी, अशा सुचनाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Rajya Sabha Election LIVE : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरु; विधानभवनातील प्रत्येक अपडेट्ससाठी क्लिक करा...

 

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Meets Sharad Pawar: पार्थ पवारांनी सिल्व्हर ओकवरती घेतली शरद पवारांची भेट, विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना निवासस्थानी नेत्यांच्या भेटी-गाठी वाढल्या
पार्थ पवारांनी सिल्व्हर ओकवरती घेतली शरद पवारांची भेट, विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असताना निवासस्थानी नेत्यांच्या भेटी-गाठी वाढल्या
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, गोकुळच्या मुद्यावरुन राऊतांचा थेट हल्लाबोल, लोकशाहीचा कौल पायदळी तुडवल्याची टीका
फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, गोकुळच्या मुद्यावरुन राऊतांचा थेट हल्लाबोल, लोकशाहीचा कौल पायदळी तुडवल्याची टीका
Nagpur News: आम्हाला तुमची लाडकी बहीण योजनाही नको, अग्रीम मदतही नको; फक्त इतका करा की...; लोहारी सावंगा गावातील महिलांची मुख्यमंत्र्याकडे मागणी, देवेंद्र फडणवीसांचाही शब्द!
आम्हाला तुमची लाडकी बहीण योजनाही नको, अग्रीम मदतही नको; फक्त इतका करा की...; लोहारी सावंगा गावातील महिलांची मुख्यमंत्र्याकडे मागणी, देवेंद्र फडणवीसांचाही मदतीचा शब्द!

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Embed widget