एक्स्प्लोर

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा घेण्यासाठी राज्यात भाजप हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करतेय; नाना पटोलेंचा आरोप

अमरावतीत जो काही प्रकार घडला त्यामागे भाजप नेत्यांचा हात असून भाजप राज्यात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करत आहेत असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. 

मुंबई : राज्यात भाजप हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करत असून याचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. ते अबंरनाथमध्ये बोलत होते. अंबरनाथ नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा आदेश त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "अमरावतीत जो काही प्रकार घडला, त्यात भाजपचे माजी मंत्री आणि त्यांचे 25-26 कार्यकर्ते वाद निर्माण करताना सापडले. त्यामुळे भाजप राज्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करत असून उत्तर प्रदेश निवडणुकीत याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, मात्र आम्ही जनतेला शांत राहण्याचं आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र शांत झाला."

एसटी कामगारांच्या आंदोलनावरूनही पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. एसटी कामगारांच्या आंदोलनामागे भाजपचे नेते आहेत हे आता उघड झालं आहे असं सांगत एसटी कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्यातलं वातावरण भाजपकडून गढूळ केलं जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. राज्य सरकार एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही. एसटी कामगारांना न्याय नक्की मिळेल, पण त्यांनी आंदोलन मागे घ्यावं, कारण संपामुळे त्यांचं नुकसान होईल, असं आवाहन पटोले यांनी केलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बदलापूरचा दौरा संपवल्यानंतर अंबरनाथ शहराचा दौरा केला. यावेळी उलन चाळ परिसरातून त्यांनी पदयात्रा काढली. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयात त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेत कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या मेळाव्यात काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी शहरात काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवरचे निर्णय स्थानिक पातळीवरच घेत असून इथल्या कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश देत असल्याचं नाना पटोले यांनी जाहीर केलं. या कार्यकर्ता मेळाव्याला अंबरनाथ शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तुफान गर्दी केली होती. नाना पटोले यांच्या आदेशानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत काय निर्णय घेतात, हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Candidate List:राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर VidhanSabhaMahayuti Seat Sharing : आरंभ है बंड! नाराज नेत्यांचा बंडखोरीचा इशारा Special ReportMVA Seat Sharing : मविआत काँग्रेसच राहणार मोठा भाऊ; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलाKhed Shivapur 5 Crore Seized : काय गाडी, काय पैसे, जनता म्हणते, नॉट ओक्के Maharashtra Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
Embed widget