राज्यातील एकूण घडामोडी पाहता हे सरकार आज पडेल की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे राणे म्हणाले. पण मी त्यांच्यासाठी अकरा दिवसांची मुदत वाढवून देतो. अकरा दिवसांमध्ये सरकार पडेल का? हे माध्यमांनी पाहावं पण मला वाटत हे सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, असं भाकीत नारायण राणेंनी केलंय. हे सरकार कोणत्याही प्रकारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेलं नाही, विकास कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबत फक्त आश्वासन दिली. पण पूर्तता करण्याची क्षमता ना मुख्यमंत्री, ना या सरकारमध्ये आहे. फक्त सत्तेसाठी व पदासाठी व सत्तेतून पैसा व पैशातुन सत्ता एकत्र आलेली ही मंडळी असल्याचा घणाघाती आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.
शिवसेनेने भूमिका बदलली -
सुधारित नागरीकत्व कायद्या संदर्भात शिवसेनेने सुरुवातीला पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यसभेत त्यांनी पटली मारली. मात्र, पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर त्यांची भूमिका बदलली हे चांगले झाल्याचं राणे यांनी सांगितले. चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. भाजप, सेना भविष्यात एकत्र येतील का? यावर हे सांगण्यासाठी मी ज्योतिष नाही. त्यासाठी ज्योतिषाकडे जावं लागेल, पण भविष्यात काहीही होऊ शकत, अशी समीकरणं मीडियातून दिसून येत असल्याचंही राणे म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्योरोप
उद्या 24 फेब्रुवारीपासून राज्यात पहिले अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वीच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर भापजने पत्रकार परिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारला तीन महिने झाले पण अजूनही त्यांना सूर गवसलेला नाही. विरोधकांशी संवाद साधण्यासाठी चहापान ठेवलं पण या तीन पक्षांमध्येच विसंवाद असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा -
विरोधाला विरोध करायचं म्हणून भाजप आम्हाला विरोध करत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल मोठी घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. येत्या तीन महिन्यात ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सतेज पाटील हे उपस्थित होते.
Narayan Rane on Uddhav Thackeray | नाणार प्रकल्प आणणार नाही हे उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं : नारायण राणे