एक्स्प्लोर

TET Exam | टीईटी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत घोळ; चुकीच्या प्रश्नांचे गुण मिळावे, विद्यार्थांची मागणी

टीईटी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत घोळाचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. प्रश्नपत्रिकेत अनेक गंभीर चुका असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : राज्यात आज जवळपास 3 लाख 43, हजार 364 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. या परीक्षेत गंभीर चुका असल्याची बाब आता समोर आली आहे. यंदा पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र रकाण्यांमध्ये वेगळेच पर्याय देण्यात आले होते. तसेच वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला, मात्र वाक्याखाली अंडरलाईन करण्यात आलेलीच नव्हती. याशिवाय आजच्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत असे अनेक चुकीचे प्रश्न होते. या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब अशी की, दोन्ही पेपरमध्ये शुद्धलेखनाच्या गंभीर चुका आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांकडून आता या चुकीच्या प्रश्नांचे गुण आम्हाला मिळावेत, अशी मागणी केली जात आहे. मागील वर्षी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेतही प्रश्नपत्रिकेत अशा चुका असल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले नव्हते. परंतु यावर्षी जर गुण देण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन करु, असा इशारा शिक्षकभारती संघटनेनं दिला आहे. आत्तापर्यंत राज्यात 7 वेळा टीईटीची परीक्षा झालेली आहे. मात्र भरती प्रक्रिया अद्याप राबवण्यात आलेली नाही. राज्यात जवळपास दीड लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत.
वर्धा आणि हिंगोलीत परीक्षा केंद्रांवर गोंधळ
टीई़टी परीक्षेला वर्धा आणि हिंगोलील काही केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वर्ध्यात टीईटी परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला न्यू इंग्लिश केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही. विद्यार्थ्यांना येण्यास उशीर झाल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं. मात्र आम्ही वेळेत आल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.हिंगोली शहरातील एकूण बारा परीक्षा केंद्रावर दोन सत्रात टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली आहे. तेथेही उशीरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. आदर्श महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावर सकाळी 10.10 वाजता गेट बंद करण्यात आला. त्यामुळे 20 ते 25 विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. टीईटी परीक्षेसाठी आलेल्या भावी शिक्षकांनी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडे विनंती करून देखील प्रवेश न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Embed widget