एक्स्प्लोर
नाशिकसह नगरमध्ये शिक्षक बँकेच्या सभेत तुफान राडा
नाशिक/अहमदनगर : नाशिकमध्येही शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. तसंच अहमदनगरमध्ये शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे.
काय घडलं नाशिकमध्ये
नाशिकमध्ये शिक्षकांच्या सभेत गोंधळ घालण्यात आला आहे. नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणेच राडा झाला. शालीमारच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सभा सुरु असताना गोंधळ झाल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
नगरमध्ये का झाला राडा?
अहमदनगरमध्ये शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान राडा झाला आहे. सभा सुरु झाल्यानंतर काही वेळातच धक्काबुक्कीला सुरुवात झाली. विरोधकांनी घोषणाबाजी करत व्यासपीठाचा ताबा घेतला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींसोबत एकमेकांबरोबर धक्काबुक्की सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला.
नगरमधील या राड्यादरम्यान महिला सदस्यांनीही व्यासपीठाचा ताबा घेत जोरदार घोषणा दिल्यामुळे गोंधळात भर पडली. तासाभराच्या राड्यानंतर पुन्हा सभेचं कामकाज सुरु करण्यात आलं. गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. त्याचे पडसाद आजच्या सभेत हाणामारीनं पाहायला मिळाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement