एक्स्प्लोर
अहमदनगरमध्ये शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शाळेतील गणिताच्या शिक्षकाने हे कृत्य केल्याची माहिती असून याप्रकरणी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रविराज चौधरी असं गणित शिक्षकाचं नाव असून 13 जानेवारी रोजी ही घटना घडली. पीडित मुलीला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. रविराज चौधरी हा जातदेवळेच्या दुर्गादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आहे. पीडित मुलगी ही दहावीत शिकते. शाळेतील शिक्षकाकडूनच तिला लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकावर पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Before You Go
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















